Assembly Election 2022 Voting Dates Revised: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! 'या' राज्यातील निवडणुकीच्या तारखांमध्ये केला बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 07:20 PM2022-02-10T19:20:39+5:302022-02-10T19:21:23+5:30
पाचही राज्यांच्या मतमोजणीचा निकाल मात्र १० मार्च रोजी येणार आहे.
Assembly Election 2022 Voting Dates and Results: राष्ट्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखा आठ जानेवारीला जाहीर केल्या. एकूण सात टप्प्यात हे मतदान पार पडणार असून पाचही राज्यातील मतमोजणी १० मार्चला होणार आहे असंही स्पष्ट केलं. परंतु आता निवडणूक आयोगाने अचानकच एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. मणिपूर (Manipur) या राज्यातील विधानसेभेच्या ६० जागांसाठी होणाऱ्या मतदानाच्या तारखा बदलण्यात आल्या असून त्यासंबंधीच्या वृत्ताला ANI ने दुजोरा दिला आहे. त्यामुळे दोन टप्प्यात पार पडणाऱ्या मतदानातील पहिल्या टप्प्याचे मतदान २७ फेब्रुवारीऐवजी २८ फ्रेब्रुवारीला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे ३ मार्चऐवजी ५ मार्च रोजी होणार आहे.
Election Commission revises Assembly poll dates for Manipur
— ANI (@ANI) February 10, 2022
Voting for the first phase of elections to take place on Feb 28 instead of Feb 27
Second phase of voting to happen on March 5 instead of March 3 pic.twitter.com/igACD2GoLo
मणिपूरच्या पहिल्या टप्प्यातील मतदारासंघातील उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ८ फ्रेब्रुवारी होती. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख उद्या आहे. या पहिल्या टप्प्याचे मतदान २७ फेब्रुवारीला पार पडेल असं सांगण्यात आलं होतं, पण आता ते २८ फेब्रुवारीला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघासाठी उमेदवारांना अर्ज भरण्याची शेवटची तारीख उद्याची असून अर्ज मागे घेण्याची मुदत १६ फेब्रुवारीपर्यंत असेल. या टप्प्यातील मतदान ३ मार्चऐवजी आता ५ मार्चला पार पडणार आहे.
२०१७ साली मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. ४ आणि ८ मार्च रोजी मणिपूरमध्ये मतदान झाले होते. तर ११ मार्चला निवडणुकीचे निकाल हाती आले होते. सध्या मणिपूरमध्ये एनडीएप्रणित भाजपचे सरकार आहे. सरकारमध्ये भाजपचे २९, नागा पीपल्स फ्रंटचे ४, नॅशनल पीपल्स पार्टीचे ३ तर एक अपक्ष आमदार आहेत. तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडे १५ जागा असून ७ जागा रिक्त आहेत.