Assembly Election Result 2018 LIVE : (त्रि)पुरात डावे गेले वाहून, मोदींची लाट; मेघालयात काँग्रेसला आखडता 'हात'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 07:47 AM2018-03-03T07:47:11+5:302018-03-03T20:45:18+5:30

मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 

Assembly Election Result 2018 LIVE : vote counting tripura meghalaya and nagaland strong security | Assembly Election Result 2018 LIVE : (त्रि)पुरात डावे गेले वाहून, मोदींची लाट; मेघालयात काँग्रेसला आखडता 'हात'

Assembly Election Result 2018 LIVE : (त्रि)पुरात डावे गेले वाहून, मोदींची लाट; मेघालयात काँग्रेसला आखडता 'हात'

Next

नवी दिल्ली -  मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एक्झिट पोलनुसार तिन्ही राज्यांमध्ये यावेळी भाजपा मोठा पक्ष म्हणून समोर येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, सलग 25 वर्षे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ताब्यात असलेल्या त्रिपुरामध्ये यावेळेस भाजपा सत्ता काबिज करेल, असा अंदाज दोन एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारीला मतदान झाले होते, तर नागालँड व मेघालयात 27 फेब्रुवारीला मतदानाची प्रक्रिया पार पडली होती.  

LIVE UPDATES :

16.25 : मेघालयमध्ये चित्र अस्पष्ट

मेघालय (एकूण जागा - ६०)
पक्षआघाडीविजय
काँग्रेस२१
एनपीपी१९
भाजप 
यूडीपी+
इतर

 

16.20 : त्रिपुरात भाजपचा मोठा विजय... ५० टक्के मतं मिळवत डाव्यांच्या गडाला खिंडार... 

त्रिपुरा (एकूण जागा - ६०)
पक्षआघाडीविजय
भाजप+0043
डावे016
काँग्रेस
इतर

'शून्य' ते 'शिखर' हा प्रवास शब्दातीत - नरेंद्र मोदी



 

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून त्रिपुरा, नागालँड, मेघालयच्या जनतेचे आभार...



 










Tripura Election Results 2018: देव आणि देवधर यांनी जिंकला त्रिपुराचा गड, जीम ट्रेनर होणार मुख्यमंत्री?

13.35 : त्रिपुरात भाजपला स्पष्ट बहुमत, डाव्यांच्या गडाला खिंडार

त्रिपुरा (एकूण जागा - ६०)
पक्षआघाडीविजय
डावे१५
भाजप+३३
काँग्रेस
इतर

13.32 ः नागालँडमध्ये नव्या मित्रासोबत भाजप सत्तेत

नागालँड (एकूण जागा-६०)
पक्षआघाडीविजय
भाजप+029
काँग्रेस00
एनपीएफ+029
इतर02

आता भारत फक्त 'काँग्रेस मुक्त'च नव्हे, तर डाव्यांपासूनही मुक्त- रविशंकर प्रसाद

13.30 : मेघालयमध्ये काँग्रेस मोठा पक्ष, पण बहुमत नाही!

मेघालय (एकूण जागा - ६०)
पक्षआघाडीविजय
काँग्रेस१२१०
एनपीपी
भाजप 
यूडीपी+
इतर






11.38 : त्रिपुरात ऐतिहासिक निकाल, भाजप ४० पार

त्रिपुरा (एकूण जागा - ६०)
पक्षआघाडीविजय
डावे१७
भाजप+४१
काँग्रेस
इतर

 












 

11.10 : मेघालयात पुन्हा काँग्रेसची सत्ता... २३ जागांची आघाडी, ३ जागांवर विजय

11.00 : नागालँडमध्येही भाजपची सरशी, नागा पीपल्स फ्रंटला धक्का...

10.45 : त्रिपुरामध्ये आता भाजपकडे निर्णायक आघाडी, ३२ जागांवर पुढे... डाव्यांना २७ जागांची आघाडी...









 

10.10 : त्रिपुरामध्ये भाजपनं डाव्यांना टाकलं मागे, २८ जागांवर घेतली आघाडी...

त्रिपुरा (एकूण जागा - ६०)
पक्षआघाडीविजय
डावे२६
भाजप+२८
काँग्रेस
इतर












9.40 : त्रिपुरामध्ये डाव्यांची 'निर्णायक आघाडी', ३२ जागांवर पुढे, भाजपची गाडी २२ जागांवर...  

9.30 : मेघालयमध्ये काँग्रेस 'सुपरफास्ट', नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटमध्ये (यूडीएफ) दुसऱ्या क्रमांकासाठी चुरस 

मेघालय (एकूण जागा - ६०)
पक्षआघाडीविजय
काँग्रेस१५
एनपीपी
भाजप 
यूडीपी+
इतर

9.15 : नागालँडमध्ये नागा पिपल्स फ्रंटनं घेतली आघाडी, भाजप पिछाडीवर

नागालँड (एकूण जागा-६०)
पक्षआघाडीविजय
भाजप+029
काँग्रेस
एनपीएफ+029
इतर02

9.00 त्रिपुरा मतमोजणीः भाजप आणि डाव्यांमध्ये 'काँटे की टक्कर'

त्रिपुरा (एकूण जागा - ६०)
पक्षआघाडीविजय
डावे२३
भाजप+१९
काँग्रेस
इतर



 

- त्रिपुरामध्ये मतमोजणीस सुरुवात, 10 जागांवर भाजपा आघाडीवर तर 9 जागांवर डाव्यांची आघाडी. भाजपा-डाव्यांमध्ये काँटे की टक्कर 

- नागालँडमध्ये पहिला कल भाजपाच्या बाजूनं आलेला आहे, भाजपानं आपलं खातं येथे उघडलं आहे.

- मतमोजणी केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही अशी अपेक्षा आहे : पोलीस 



 



 

 








Web Title: Assembly Election Result 2018 LIVE : vote counting tripura meghalaya and nagaland strong security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.