Assembly Election Result 2022: पाच राज्यांतील विधानसभांच्या निकालांनंतर प्रशांत किशोर यांचं मोठं विधान, म्हणाले २०२४ मध्ये....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 11:49 AM2022-03-11T11:49:12+5:302022-03-11T11:50:19+5:30

Assembly Election Result 2022: पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर देशातील प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांमधील विजयानंतर भारतीय जनता पक्ष विरोधकांवर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.

Assembly Election Result 2022: Prashant Kishor's big statement after Assembly results in five states, said in 2024 .... | Assembly Election Result 2022: पाच राज्यांतील विधानसभांच्या निकालांनंतर प्रशांत किशोर यांचं मोठं विधान, म्हणाले २०२४ मध्ये....

Assembly Election Result 2022: पाच राज्यांतील विधानसभांच्या निकालांनंतर प्रशांत किशोर यांचं मोठं विधान, म्हणाले २०२४ मध्ये....

Next

नवी दिल्ली - काल लागलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये भाजपाने दणदणीत यश मिळवले. भाजपाने या पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांत स्पष्ट बहुमत मिळवले. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसला धोबीपछाड देत निर्विवाद बहुमत मिळवले. दरम्यान, या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर देशातील प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांमधील विजयानंतर भारतीय जनता पक्ष विरोधकांवर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र दिल्लीमधील सत्तेसाठीची खरी लढाई ही कुठल्याही राज्यातील निवडणुकीतून नाही तर, २०२४ मध्येच लढली जाईल.

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर प्रशांत किशोर यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये ते म्हणतात की, भारतासाठीची लढाई २०२४ मध्ये लढली जाईल. कुठल्याही राज्यातील निवडणुकांमधून ती लढली जाणार नाही. साहेब हे ओळखतात. त्यामुळेच विरोधकांवर चाणाक्षपणे मानसिक आघाडी घेण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे तुम्ही या खोट्या नरेटिव्हच्या जाळ्यात फसू नका.

दरम्यान, पाच राज्यामधील विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी भाजपाने दमदार कामगिरी केली आहे. या पाचपैकी चार राज्यांत भाजपाने सत्ता राखताना विजय मिळवला आहे. त्यातही भाजपाने सत्ताविरोधी लाट असताना उत्तर प्रदेशात ज्याप्रकारे विजय मिळवला त्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अनेक राजकीय जाणकारांच्या मते भाजपाने ज्या पद्धतीमे उत्तर प्रदेशमध्ये विज. मिळवला आहे. त्याचा फायदा भाजपाला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये होणार आहे.

गेल्या वर्षी झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला पराभूत करण्यामध्ये प्रशांत किशोर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यानंतर ममता बॅनर्जींच्या पक्षातील काही नेत्यांसोबत त्यांचे मतभेद झाल्याची चर्चा होती. मात्र आता ही नाराजी दूर झाली आहे. तसेच राजकीय सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांच्यासोबत करार सुरू ठेवण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसने घेतल्याचे वृत्त आहे.  

Web Title: Assembly Election Result 2022: Prashant Kishor's big statement after Assembly results in five states, said in 2024 ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.