'माय का लाल' विधानावरुन भाजपाचं नुकसान, शिवराज सिंह चौहानांना घरचा अहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 01:02 PM2018-12-10T13:02:21+5:302018-12-10T13:11:50+5:30
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगणातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. जनतेनं आपला कौल कोणत्या पक्षाला दिला आहे, याचे चित्र मंगळवारी (11 डिसेंबर) स्पष्ट होणार आहे.
भोपाळ : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगणातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. जनतेनं आपला कौल कोणत्या पक्षाला दिला आहे, याचे चित्र मंगळवारी (11 डिसेंबर) स्पष्ट होणार आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी पार पडणार आहे. दरम्यान, निकाल येण्यापूर्वीच भाजपाचे खासदार रघुनंदन शर्मा यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर निशाणा साधला आहे. शर्मा यांनी चौहान यांच्या 'माय का लाल' विधानावर आक्षेप नोंदवत प्रश्न उपस्थित केले आहेत.
याबाबत शर्मा म्हणाले की, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या 'माय का लाल' विधानामुळे जनतेमध्ये नाराजी पसरली. या विधानामुळे आमचं नुकसान झालं आहेच. जर अशा प्रकारे शब्दांचा प्रयोग केला गेला नसता तर आणखी 10-15 जागांवर भाजपाचा विजय होऊ शकला असता आणि अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली नसती.
(EXIT POLL : मध्य प्रदेशमधून भाजपाची एक्झिट? पण अटीतटीच्या लढतीचा अंदाज)
पुढे शर्मा असंही म्हणाले की, कदाचित आम्ही चुकाही केल्या असतील. त्यामुळेच एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या बाजूनं कौल वर्तवण्यात आला नाही. हे अंदाज चुकीचेही सिद्ध होऊ शकतो. पण 200 हून अधिक जागा सोडाच, मागील विधानसभा निवडणुकीएवढ्याच जागा मिळाल्या तरीही आम्ही समाधान मानू.
Raghunandan Sharma, BJP: Logon ka aakrosh tha ki CM ne iss prakar ki baat keh di ki koi 'mai ka lal...'. Isse hamara nuksan to hua hai aur lagta hai ki yadi iss prakar ke shabdon ka prayog nahi hota to 10-15 seetein hamari aati aur ye anishchint'ta ki sthiti banti nahi. (09.12) pic.twitter.com/9MkUKaMO6h
— ANI (@ANI) December 10, 2018
Raghunandan Sharma, BJP: We might've made mistakes, so exit polls...they might turn out to be wrong but they also don't meet expectations. Let alone 200+ seats, we'll be satisfied if we get no.of seats we won last time. But even if we don't get that, BJP will get majority.(09.12) https://t.co/Ls29T4Hmvh
— ANI (@ANI) December 10, 2018
नेमके काय म्हणाले होते शिवराजसिंह चौहान?
आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना शिवराजसिंह चौहान म्हणाले होते की,'कोणी माय का लाल आरक्षण रद्द करू शकत नाही.' या विधानावरुन त्यांच्यावर चौफेर टीकादेखील झाली होती.
एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात काँग्रेस सत्तेवर येईल वा सत्तेपाशी पोहोचेल. मध्य प्रदेशात काँग्रेस व भाजपात चुरशीची लढत दिसत असून, तीन चाचण्यांनी काँग्रेसला बहुमत मिळेल वा तो पक्ष सत्तेपर्यंत पोहोचेल, असे म्हटले आहे.
काही चाचण्यांचे निष्कर्ष
मध्य प्रदेश 230 जागा 75% मतदान
सर्वे भाजपा काँग्रेस इतर
अॅक्सिस माय इंडिया-इंडिया टुडे 102-122 104-122 4-11
टाइम्स नाऊ-सीएनएक्स 126 89 15
एबीपी-लोकनीती 94 126 10
इंडिया न्यूज-नेता 106 112 12
रिपब्लिक 108-128 95-115 7
न्यूज नेशन 108-112 105-109 11-15
इंडिया टीव्ही 122-130 86-92 6-9