'मोदीजी मागच्या दारानं सोनिया गांधींना पंतप्रधान बनवताहेत', अरविंद केजरीवाल असं का म्हणाले? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 02:05 PM2022-09-13T14:05:44+5:302022-09-13T14:06:13+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे.

assembly elections 2022 aap national convenor arvind kejriwal in ahmedabad attacks on bjp | 'मोदीजी मागच्या दारानं सोनिया गांधींना पंतप्रधान बनवताहेत', अरविंद केजरीवाल असं का म्हणाले? वाचा...

'मोदीजी मागच्या दारानं सोनिया गांधींना पंतप्रधान बनवताहेत', अरविंद केजरीवाल असं का म्हणाले? वाचा...

Next

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. केजरीवाल संपूर्ण गुजरात पिंजून काढत आहेत. अहमदाबादमध्ये आयोजित पक्षाच्या एका कार्यक्रमात संबोधित करताना केजरीवालांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. तसंच भाजपाकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. 

"आम आदमी पक्षाकडून गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी मेधा पाटकर या उमेदवार असणार आहेत असं मी ऐकलं. भाजपावाले असं बोलत आहेत. त्यावर माझं उत्तर असं आहे की मीही ऐकलंय की मोदीजी मागच्या दारानं सोनिया गांधींना पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी प्रयत्न करत आहेत", अशा खोचक शब्दात केजरीवालांनी भाजपाच्या आरोपांना उत्तर दिलं. गुजरातमधून भाजपाचा सूपडासाफ होणार आहे आणि आम आदमी पक्षाचं सरकार येणार आहे असा दावा केजरीवालांनी केला. 

"मी गेल्या काही महिन्यांपासून गुजरामध्ये फिरतोय आणि लोकांना भेटतोय. वकील, ऑटो रिक्षाचालक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की गुजरात सरकारकडून खूप भ्रष्टाचार होत आहे. व्यापारी आणि उद्योगपतींना धाड टाकण्याची धमकी दिली जात आहे. लोकांना कोणतंही सरकारी काम करायचं असेल तर लाच द्यावी लागते. तसंच सरकार विरोधात काही बोललं तर त्यांना धमकावलं जातं. व्यापाऱ्यांना त्यांचा धंदा बंद करुन टाकण्याची धमकी दिली जात आहे. सर्व ठिकाणी भ्रष्टाचार आणि गुंडगिरी वाढली आहे. पण आज मी आश्वासन देऊ इच्छितो की आम आदमी पक्षाचं सरकार आलं तर भ्रष्टाचामुक्त आणि भयमुक्त प्रशासन आम्ही देऊ", असं केजरीवाल म्हणाले. 

केजरीवालांनी गुजरातच्या जनतेला दिली महत्वाची आश्वासनं

१. आमचा कोणीही मुख्यमंत्री, मंत्री, आमदार असो, आमचा कोणताही खासदार असो किंवा इतर कुणीही असो कोणालाही भ्रष्टाचार करू देणार नाही. भ्रष्टाचार केला तर तुरुंगात पाठवू. गुजरातच्या जनतेचा पैसा गुजरातच्या विकासावर खर्च केला जाईल.

२. 'आप'चे सरकार आल्यावर सरकारमध्ये प्रत्येक व्यक्तीचे काम कोणतीही लाच न घेता होईल. अशी व्यवस्था करणार की सरकारी कार्यालयांचे खेटे घालावे लागणार नाहीत. सरकार तुमच्या घरी येईल. दिल्लीत डोअरस्टेप डिलिव्हरी योजना लागू आहे.

३. नेते, मंत्री, आमदार यांचे सर्व काळे धंदे बंद होतील. विषारी दारू विकली जात आहे ते कायमस्वरुपी बंद करुन टाकू.

४. पेपरफुटी थांबवली जाईल, मागील पेपर फुटीची प्रकरणे उघडून दोषींना तुरुंगात टाकले जाईल.

५. आधीच्या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या सर्व मोठ्या घोटाळ्यांची चौकशी केली जाईल. लुटलेले पैसे परत मिळतील आणि त्या पैशातून तुमच्यासाठी शाळा-रुग्णालये बांधली जातील, वीज-रस्ते चालतील.

Web Title: assembly elections 2022 aap national convenor arvind kejriwal in ahmedabad attacks on bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.