Assembly Elections 2022 Result Live : गोव्यातील सर्व जागांचे निकाल जाहीर, भाजपाला २० तर काँग्रेसला ११ जागा

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 06:39 AM2022-03-10T06:39:58+5:302022-03-10T19:27:33+5:30

Goa, Manipur, Uttarakhand, Punjab Assembly Election 2022 Live Updates: गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभेच्या जागांसाठी झालेल्या ...

Assembly Elections 2022 Live Updates Goa Manipur Uttarakhand Punjab Legislative Result BJP Congress Aam Aadmi Party Trinamool Congress; Counting begin from 8am in four States include Goa | Assembly Elections 2022 Result Live : गोव्यातील सर्व जागांचे निकाल जाहीर, भाजपाला २० तर काँग्रेसला ११ जागा

Assembly Elections 2022 Result Live : गोव्यातील सर्व जागांचे निकाल जाहीर, भाजपाला २० तर काँग्रेसला ११ जागा

googlenewsNext

Goa, Manipur, Uttarakhand, Punjab Assembly Election 2022 Live Updates: गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज गुरुवारी जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

LIVE

Get Latest Updates

09:04 PM

मणिपूरमध्ये स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मानले जनतेचे आभार

07:30 PM

गोव्यातील सर्व जागांचे निकाल जाहीर, भाजपाला २० तर काँग्रेसला ११ जागा

गोव्यातील सर्व जागांचे निकाल जाहीर, भाजपाला २० तर काँग्रेसला ११ जागा, तर आप, मगोपला प्रत्येकी दोन आणि गोवा फॉरवर्ड व युनायटेड गोवन्स पक्षाला प्रत्येकी एक जागा. अपक्षांच्या खात्यात तीन जागा 

06:29 PM

उत्तराखंड निवडणूक निकाल - भाजपा 20 जागांवर विजयी आणि 27 वर आघाडी, काँग्रेस 6 वर विजयी आणि 13 वर आघाडी, बसपा 1, अपक्ष 2 वर आघाडीवर.


 

06:28 PM

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी भदौर (37,558 मतांनी) आणि चमकौर साहिब (7942 मतांनी) हरले.


 

06:22 PM

निकालांमुळे निराश, चांगल्या परिस्थितीची अपेक्षा. आम्ही जबाबदार विरोधी पक्ष राहू आणि आक्रमकपणे मुद्दे मांडू - दिनेश गुंडू राव, काँग्रेस


 

06:21 PM

भाजपा 4 राज्यांमध्ये सरकार स्थापन करणार - कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई


 

05:55 PM

"मला विश्वास आहे की 2023 मध्ये आम्ही कर्नाटकात पुन्हा सत्तेत येऊ"

भाजपा 4 राज्यांमध्ये सरकार स्थापन करणार आहे. हे अगदी स्पष्ट आहे की 2024 मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार येईल आणि पंतप्रधान मोदींचे 'न्यू इंडिया'चे स्वप्न पूर्ण होईल. मला विश्वास आहे की 2023 मध्ये आम्ही कर्नाटकात पुन्हा सत्तेत येऊ - बसवराज बोम्मई
 

05:41 PM

माझ्यासाठी निकाल खूप आश्चर्यकारक - हरीश रावत


 

05:33 PM

"लोककल्याण आणि सामाजिक न्यायाची व्याख्या काय आहे?"

माझ्यासाठी निकाल खूप आश्चर्यकारक आहेत. मला समजू शकत नाही की एवढ्या प्रचंड महागाईनंतर, जर हा जनतेचा आदेश असेल, तर लोककल्याण आणि सामाजिक न्यायाची व्याख्या काय आहे?  यानंतर लोक 'भाजपा जिंदाबाद' म्हणतील हे मला समजत नाही - काँग्रेस नेते हरीश रावत

05:14 PM

मणिपूरमध्ये भाजपाने सत्ता तर राखलीच, पण जागाही वाढल्या

05:07 PM

भाजपला मिळालेल्या प्रचंड यशानंतर मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांच्यासह कार्यकर्त्यांचा जल्लोष.

04:58 PM

"जनतेचा आशीर्वाद मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो हे मान्य करतो"


 

04:50 PM

पाच राज्यांचे निकाल काँग्रेस पक्षाच्या अपेक्षेविरुद्ध आले - आर. एस. सुरजेवाला

पाच राज्यांचे निकाल काँग्रेस पक्षाच्या अपेक्षेविरुद्ध आले आहेत, पण जनतेचा आशीर्वाद मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो हे आम्ही मान्य करतो. सोनिया गांधी यांनी निकालाचे आत्मपरीक्षण करण्यासाठी लवकरच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे - काँग्रेस नेते आर. एस. सुरजेवाला
 

04:43 PM

पराभवाची जबाबदारी घेतो - काँग्रेस नेते हरीश रावत


 

04:34 PM

"उत्तराखंडच्या जनतेवर विजय मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न थोडे कमी पडले"

उत्तराखंडच्या जनतेवर विजय मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न थोडे कमी पडले. आम्हाला खात्री होती की लोक बदलाला मतदान करतील, आमच्या प्रयत्नांमध्ये नक्कीच कमतरता असेल, मी ते स्वीकारतो आणि पराभवाची जबाबदारी घेतो - हरीश रावत
 

04:27 PM

पाचही राज्यात पक्षाचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, "लोकांचा निर्णय नम्रपणे स्वीकारा"


 

04:24 PM

गोव्यात आजच शपथविधी? प्रमोद सावंत राज्यपालांची भेट घेणार, संध्याकाळी भाजप सरकार स्थापन होणार

04:15 PM

उत्तर प्रदेशात विकासाचा बुलडोझर फिरत राहील - पीयूष गोयल


 

04:11 PM

"गोवा आणि मणिपूरमध्ये पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळताहेत"

पंतप्रधान मोदींची देशभरातील लोकप्रियता दिसून येते. नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्या सामाजिक कल्याणकारी योजनांचे परिणाम आहेत ज्या प्रामाणिकपणे राबवल्या गेल्या. उत्तर प्रदेशात विकासाचा बुलडोझर फिरत राहील. आम्हाला गोवा आणि मणिपूरमध्ये पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळत आहेत - पीयूष गोयल
 

04:05 PM

आम्ही या देशाचे राजकारण बदलू - अरविंद केजरीवाल


 

04:02 PM

"लोकांनी आमच्यावर खूप विश्वास ठेवला आहे, आम्ही तो तोडणार नाही"

माझा धाकटे भाऊ भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करू इच्छितो. 'आप'ने ९० जागांचा टप्पा ओलांडला, निकाल अजून येत आहेत; लोकांनी आमच्यावर खूप विश्वास ठेवला आहे, आम्ही तो तोडणार नाही. आम्ही या देशाचे राजकारण बदलू - अरविंद केजरीवाल
 

04:00 PM

काँग्रेसच्या उमेदवार मालविका सूद पराभूत

पंजाबच्या मोगा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार मालविका सूद यांचा आपच्या डॉ अमनदीप कौर अरोरा यांनी २०,००० हून अधिक मतांनी पराभव केला आहे.
 

03:56 PM

गोवा आणि उत्तर प्रदेशातील कलांवरून भाजपनं मुसंडी मारल्याचं चित्र

03:51 PM

भगतसिंह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो सरकारी कार्यालयात लावणार आहे - आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान

03:48 PM

अरविंद केजरीवालांनी मानले जनतेचे आभार

03:29 PM

पंजाबवालो तुस्सी कमाल कर दित्ता - अरविंद केजरीवाल

03:25 PM

लोकांना राजकारणात एक पर्याय मिळाला आणि पंजाबच्या जनतेने त्या पर्यायाला संधी दिली - आप नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया

03:22 PM

नवज्योतसिंग सिद्धू यांचा अमृतसर पूर्व मतदारसंघातून 6,750 मतांच्या फरकाने पराभव.

03:16 PM

गोव्यातील जनतेने आम्हाला स्पष्ट बहुमत दिले - देवेंद्र फडणवीस


 

03:09 PM

"अपक्ष उमेदवार आमच्यासोबत येत आहेत"

गोव्यातील जनतेने आम्हाला स्पष्ट बहुमत दिले आहे. आम्हाला 20 जागा मिळतील किंवा 1-2 जागा जास्त मिळतील. जनतेने पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला आहे. अपक्ष उमेदवार आमच्यासोबत येत आहेत. MGP ही आमच्यासोबत येत आहे आणि सर्वांना सोबत घेऊन आम्ही आमचे सरकार बनवू - भाजपा नेते देवेंद्र फडणवीस
 

03:08 PM

शहीद भगतसिंग यांच्या गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार - भगवंत मान


 

03:04 PM

निवडणुकांच्या निकालांवर काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

03:01 PM

निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव - संजय राऊत

02:55 PM

"पंजाबमध्ये लोकांना दुसरा पर्याय मिळाला आणि त्यांनी 'आप'ला निवडून दिले"

या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पंजाबमध्ये लोकांना दुसरा पर्याय मिळाला आणि त्यांनी 'आप'ला निवडून दिले. भाजपचा विजय हा त्यांच्या निवडणूक व्यवस्थापनाचाही विजय आहे - शिवसेना नेते संजय राऊत

02:53 PM

चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना खोचक टोला

02:48 PM

सध्याच्या कलांनुसार मणिपूरचा राजमुकुट भाजपच्या शिरावर

02:46 PM

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा 19,873 मतांनी पराभव.

02:44 PM

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे भदौरमध्ये (२२,८४३ मतांनी) आणि चमकौर साहिब (२६७१ मतांनी) पिछाडीवर

02:07 PM

भाजपाचं सत्तास्थापनेचं गणित ठरलं; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनीच सांगितली दोन 'मित्रां'ची नावं

01:37 PM

भाजपला पराभूत करणं म्हणजे भींतीवर डोकं आपटणं - पाटील

01:34 PM

आम्ही विरोधी पक्ष म्हणून प्रभावी भूमिका निभावू - मायकल लोबो

आम्हाला वाटलं होतं, आम्ही जिंकू, पण जनादेश आम्हाला मान्य आहे. गोव्यात आम्ही 12 जागा जिंकल्या असून भाजपने 18 जांगावर विजय मिळवला आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे काम करू... असे काँग्रेस नेते मायकल लोबो यांनी म्हटलंय

01:23 PM

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे भदौरमध्ये (२२,८४३ मतांनी) आणि चमकौर साहिब (२६७१ मतांनी) पिछाडीवर

01:13 PM

विजयानंतर प्रमोद सावंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

साखळी मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा आपल्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय गोव्यात भाजपच सरकार स्थापन करेल असा दावाही त्यांनी केला.

01:00 PM

पंजाब काँग्रेस प्रमुख सिद्धू यांनी 'आप'ला दिल्या शुभेच्छा

पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांनी सुरुवातीच्या कलांमध्ये दिसत असलेल्या आपच्या विजयानंतर त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. "जनतेचा आवाजच इश्वराचा आवाज आहे," असं ट्वीट नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं आहे.

12:43 PM

मणिपुरातील सुरुवातीच्या कलांवरून भाजप बहुमताच्या दिशेने

मणिपुरमध्ये सुरूवातीच्या कलांवरून भाजप बहुमताच्या जवळ पोहोचत असल्याचं दिसून येत आहे. सध्या भाजप ३१ जागांवर, काँग्रेस ७ आणि अन्य २२ जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. 

12:38 PM

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा साखळी विधानसभा मतदारसंघातून विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी यांचा पराभव केला आहे.

12:32 PM

पटियालामधून माजी मुख्यमंत्री कॅप्टर अमरिंदर सिंग यांचा पराभव

पंजाबच्या पटियाला अर्बन सीटवरून माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव झाला आहे. आम आदमी पक्षाते अजितपाल सिंग कोहली यांनी त्यांचा १३ हजार मतांनी पराभव केला आहे. निवडणुकीपूर्वी अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसची साथ सोडून आपला पक्ष स्थापन केला होता.
 

12:26 PM

अन्य राज्यांमध्येही आमच्या पक्षावर जनता विश्वास करेल : मनीष सिसोदिया

गोवा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. याशिवाय पंजाबमध्येही आपनं आपले उमेदवार उतरवले होते. दरम्यान पंजाबमध्ये आपची वाटचाल बहुमताच्या दिशेने जात आहे. यावर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही तीन राज्यांमध्येही निवडणुकीसाठी उमेदवार उतरवले होते. परंतु आमचं लक्ष्य पंजाबवर होतं. हळूहळू सर्वच राज्यांमधील जनता आमच्या पक्षावर विश्वास ठेवतील," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

12:16 PM

पराभवानंतर उत्पल पर्रीकर यांची पहिली प्रतिक्रिया

भाजपची साथ सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढणारे उत्पल पर्रिकर यांचा भाजपच्या बाबूश मोन्सेरात यांनी ७१३ मतांनी पराभव केला आहे. यानंतर उत्पल पर्रीकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "मी सर्व मतदारांचे आभार मानतो. अपक्ष उमेदवार म्हणून ही लढत चांगली होती. या लढतीबाबत मी समधानी आहे, परंतु निकाल निराशाजनक आहेत," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

12:05 PM

भाजपचे माजी मंत्री मिलिंद नाईक यांचा पराभव

शिरोडा मतदारसंघात भाजपचे सुभाष शिरोडकर विजयी. तर सावर्डेतून भाजपचे गणेश गावकर विजयी. मंत्री दीपक पाऊसकर यांना तिकीट नाकारले होते. भाजपचे माजी मंत्री मिलिंद नाईक यांचाही पराभव.

11:41 AM

दिल्लीत ईव्हिएमविरोधात काँग्रेसचं आंदोलन

दिल्लीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएमविरोधात काँग्रेसचं आंदोलन सुरू झालं आहे. पक्षाच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते पोस्टर घेऊन दाखल झाले आहे.

11:41 AM

गोव्यात अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांचा पराभव

गोव्यात भाजपची साथ सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढणाऱ्या उत्पल पर्रीकर यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या बाबुश मोन्सेरात यांनी उत्पल पर्रीकरांचा पराभव केला. 

11:38 AM

पंजाबचा विजाय आमच्यासाठी मोठी जबाबदारी - आप नेते जरनेल सिंग

पंजाबमध्ये आतापर्यंतच्या कलांवरून पंजाबमध्ये आम आदमी पक्ष बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे. "दिल्लीत आतापर्यंत जी आश्वासनं दिली ती अरविंद केजरीवाल यांनी पूर्ण केलं. आता तेच भगवंत मान दिल्लीत पूर्ण करतील. हा विजय आमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. आम्ही कायमच एक पूर्ण राज्याबाबत बोलत होतो. जे आज आम्हाला मिळालं आहे. आम्ही त्या ठिकाणी आमचं प्रशासन दाखवून देऊ," असं मत  आपचे नेते जरनेल सिंग यांनी व्यक्त केलं.

11:15 AM

आपचे भगवंत मान २१ हजार मतांनी आघाडीवर

पंजाबमधील आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान हे सध्या २१ हजार मतांनी आघाडीवर आहेत. धुरी सीटवरून काँग्रेसचे दलवीरसिंग गोल्डी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

11:11 AM

आपच्या कार्यालयांमध्ये जल्लोष; नवा पोस्टर आला समोर

पंजाबमध्ये सुरूवातीच्या निकालांमध्ये आपनं मोठी मुसंडी मारली आहे. आपच्या कार्यालयांमध्ये सध्या जल्लोष पाहायला मिळत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाब आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंतसिग मान यांचा नवा पोस्टर समोर आला आहे.
 

 

11:01 AM

गोव्यात मुख्यमंत्री पिछाडीवर, तर दोन्ही उपमुख्यमंत्री पराभवाच्या छायेत

पणजी : गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअंती काँग्रेसचे धर्मेश सगलानी यांच्यापेक्षा ४१७ मतांनी पीछाडीवर आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक निकाल काही तासातच अपेक्षित आहेत. चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर व मनोहर उर्फ बाबू आजगांवकर हे दोन्ही उपमुख्यमंत्रीही पराभवाच्या छायेत आहेत.

10:46 AM

निवडणूक निकालाचे पहिल्या दोन तासांतील अगदी अचूक आणि महत्वाचे १० मुद्दे

निवडणूक निकालाचे पहिल्या दोन तासांतील अगदी अचूक आणि महत्वाचे १० मुद्दे...#ElectionsWithLokmathttps://t.co/byXZlotnaT

— Lokmat (@lokmat) March 10, 2022

10:34 AM

निवडणूक आयोगानुसार गोव्यातील सद्य परिस्थिती

 

10:34 AM

पंजाब : मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वीच काँग्रेसनं पराभव स्वीकारला; मुख्यमंत्री राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार

पंजाबमध्ये मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वीच काँग्रेसनं पराभव स्वीकारला. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवणार आहेत. मुख्यमंत्री आपल्या सरकारी निवासस्थानी पोहोचले आहेत. 

10:14 AM

येणाऱ्या दिवसांत आप कांग्रेसचं रिप्लेसमेंट बनेल - आप

लोकांच्या खिशातून पैसे काढून हे लोक आपले महाल सजवत आहे. आज यांच्या महालात लावण्यात आलेली एक एक विट ही सामान्य माणसाच्या कष्टाची आहे. या संपूर्ण व्यवस्थेला बदलायचं आहे. आज भारताच्या इतिहासातील मोठा दिवस आहे. येणाऱ्या दिवसांत आप कांग्रेसचं रिप्लेसमेंट बनेल - राघव चड्ढा, आम आदमी पार्टी

10:12 AM

निकाल सकारात्मकच येणार, पंजाबच्या जनतेचे आभार - आप

आतापर्यंतचे कल हे सकारात्मक आहेत. जे काही निकाल येतील तेही सकारात्मक असतील. पंजाबच्या जनतेचे आम्ही आभार मानतो. त्यांनी बदलाच्या दिशेनं आम्ही केलेल्या संकल्पाला पूर्ण केलं आहे. - गोपाल राय, आम आदमी पार्टी

10:07 AM

सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप दोन राज्यांत बहुमताच्या दिशेने

सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप बहुमताच्या दिशेनं जात असल्याचं दिसून येत आहे. उत्तराखंडशिवाय भाजप गोव्यातही बहुमताच्या दिशेनं आगेकुच करताना दिसत आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपनं मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. उत्तराखंडमध्ये भाजप ४३ तर गोव्यात भाजप २० जागांवर आघाडीवर.


     

09:59 AM

मणिपूरमध्ये भाजपाने २८ जागांवर आघाडी, तर काँग्रेस ९ जागांवर पुढे

09:58 AM

उत्तराखंड सर्व ७० जागेचे सुरुवातीचे कल हाती, ४२ जागांवर भाजपला आघाडी

उत्तराखंड सर्व ७० जागेचे सुरुवातीचे कल हाती, ४२ जागांवर भाजपला आघाडी मिळाल्याचं दिसून येतंय. तर २४ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

09:34 AM

पंजाब : मुख्यमंत्री चन्नी दोन्ही जागांवर पिछाडीवर

पंजाबचे मुख्यमंत्री दोन जागांवर पिछाडीवर आहेत. ते सध्या भदोडमधून तसंत चमकौर साहिब या दोन्ही मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. पंजाबमध्ये सध्या आम आदमी पक्ष आघाडीवर आहे.

09:34 AM

निवडणूक आयोगानुसार सुरूवातीच्या कलांमध्ये आम आदमी पक्ष ६४ जागांवर आघाडीवर. पंजाबमध्ये बहुमतासाठी गाठावा लागणार आहे. ५९ चा आकडा. सुरूवातीच्या कलांवरुन आपची बहुमताच्या दिशेनं वाटचाल.

09:20 AM

गोव्यात पुन्हा एकदा भाजप आघाडीवर

गोव्यात सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप पुन्हा पुढे जाताना दिसत आहे. गोव्यामध्ये पुन्हा एकदा भाजप आघाडीवर जाताना दिसतंय. सध्या भाजप १८ जागांवर आघाडीवर असून कांग्रेस १६ जागांवर आघाडीवर आहे. तर अन्य ३ जागांवर आघाडीवर आहे.

09:20 AM

पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू पिछाडीवर, ते आता दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत

पंजाबमध्ये काही वेळापूर्वी आघाडीवर असलेले काँग्रेसचे उमेदवार नवज्योत सिंग सिद्धू हे पिछाडीवर गेले आहेत. ते आता दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.

09:12 AM

प्रकाश सिंग बादल यांना विजयाची अपेक्षा

मतमोजणीला सुरूवात होण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बागल यांनी आपल्या कुटुंबीयांसह घरी पूजा केली. त्यांनी विजयाची अपेक्षा व्यक्त केली असून निकाल स्पष्ट झाल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

09:12 AM

भाजपचे विश्वजित राणे आणि त्यांच्या पत्नी आघाडीवर

गोव्यातील वाळपई मतदारसंघातून भाजपचे विश्वजित राणे हे आघाडीवर आहे. तर विश्वजित राणे यांच्या पत्नी दिव्या राणे या देखील पर्रीमधून आघाडीवर आहेत.

 

08:57 AM

गोव्यात पणजीतून अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर आघाडीवर

गोव्यात पणजीतून विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर आघाडीवर आहेत. निवडणुकीपूर्वी पणजीतून उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. 

08:39 AM

उत्तराखंडमध्ये काँग्रेस आघाडीवर, तर पंजाबमध्ये AAP पुढे

पंजाबमध्ये आपला २३ जागांवर आघाडी तर काँग्रेस १७ जागांवर आघाडीवर. अकाली दल ५ जागांवर तर भाजप ५ जागांवर आघाडीवर

08:30 AM

आम्ही गोव्यात बहुमत मिळवू - प्रमोद सावंत

मतमोजणीच्या दिवशी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजीच्या दत्त मंदिरात पूजा केली. आम्ही बहुमतानं विजय मिळवू अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

08:20 AM

एक देश एक निवडणुकीसाठी संविधानात बदल आवश्यक - मुख्य निवडणूक आयुक्त

एक देश एक निवडणुकीसाठी संविधानात बदल करण्याची आवश्यकता आहे. हे कशाप्रकारे केलं जाईल याचा निर्णय संसदेत घेतला गेला पाहिजे. निवडणूक आयोग यासाठी सक्षम आहे. यामुळे पाच वर्षांमध्ये केवळ एकदाच निवडणूक होईल : मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा

08:16 AM

परिस्थिती समजून घेतल्याबद्दल आम्ही आभारी - ख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत होता. काही राज्यांमध्ये सर्वांचं लसीकरण झालं होतं. पहिल्या आठवड्यात कोणतीही रॅली, पदयात्रा काढल्या जाणार नाहीत, केवळ डिजिटल रॅली आणि घरी जाऊन प्रचार करण्यासाठी निवडणूक आयोगानं परवानगी दिली होती. परंतु त्यासाठी संख्या मर्यादित होती. कोणत्याही राजकीय पक्षानं याचा विरोध केला नाही. मतदारांनी आणि राजकीय पक्षांनी परिस्थिती समजून घेतली यासाठी आम्ही आभारी आहोत - मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा

08:04 AM

पाचही राज्यांमध्ये मतमोजणीला सुरूवात

पाचही राज्यांमध्ये मतमोजणीला सुरूवात. काही वेळातच पहिला कल येणार समोर.

 

07:54 AM

जनता काँग्रेसला बहुमत देईल : हरीश सिंह रावत

उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश सिंग रावत यांनी विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी आपल्या घरी पूजा केली. यावेळी त्यांनी पक्षाच्या विजयाबद्दल आपल्याला खात्री असल्याचं म्हटलं. तसंच जनता काँगेसला बहुमत देईल आणि एक दोन तासांत चित्र स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले. 

07:36 AM

भंंगवंत मान यांनी संगरूरमध्ये गुरुद्वारा गुर्सागर मस्तुअना साहिब येथे आशीर्वाद घेतले

आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी संगरूरमध्ये गुरुद्वारा गुर्सागर मस्तुअना साहिब येथे आशीर्वाद घेतले. पंजाबच्या लोकांनी बदलासाठी मत दिलं असावं असं मत मान यांनी केलं व्यक्त.

07:06 AM

पणजीमध्ये मतमोजणी केंद्रांवर कार्यकर्ते, कर्मचारी येण्यास सुरुवात



 

06:52 AM

पंजाब विधानसभा निवडणूक २०१७ चा निकाल

पंजाब विधानसभा निवडणूक २०१७
एकूण जागा: ११७
बहुमत: ५९
 
काँग्रेस: ७७
आप: २०
शिरोमणी अकाली दल : १५
भाजप: ३
लोक इंसाफ पार्टी : २

06:52 AM

पंजाब विधानसभा निवडणूक २०१२ चा निकाल

पंजाब विधानसभा निवडणूक २०१२
एकूण जागा: ११७
बहुमत: ५९
 
शिरोमणी अकाली दल : ५६
काँग्रेस: ४६
भाजप: १२
अपक्ष: २

 

06:52 AM

गोवा विधानसभा निवडणूक २०१७ चा निकाल

गोवा विधानसभा निवडणूक २०१७
एकूण जागा: ४०
बहुमत: २१
 
काँग्रेस: १७
भाजप: १३
अपक्ष: ३
महाराष्ट्रवादी गोमंतक: ३
गोवा फॉरवर्ड पार्टी: ३
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: १

06:51 AM

पंजाबचे मुख्यमंत्री गुरुद्वारा श्री कतलगढ़ साहिबच्या दरबारी



 

06:43 AM

पंजाबचे मुख्यमंत्री गुरुद्वारा श्री कतलगढ़ साहिबच्या दरबारी



 

06:43 AM

गोवा विधानसभा निवडणूक २०१२ चा निकाल

गोवा विधानसभा निवडणूक २०१२
एकूण जागा: ४०
बहुमत: २१
 
भाजप: २१
काँग्रेस: ९
अपक्ष: ५
महाराष्ट्रवादी गोमंतक: ३
गोवा विकास पार्टी: २

 

Web Title: Assembly Elections 2022 Live Updates Goa Manipur Uttarakhand Punjab Legislative Result BJP Congress Aam Aadmi Party Trinamool Congress; Counting begin from 8am in four States include Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.