Assembly Result 2022: सरकार आता विद्यार्थींनींना मोफत स्कुटी, महिलांना दरमहा 1 हजार देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 05:36 PM2022-03-10T17:36:43+5:302022-03-10T17:38:34+5:30
युपीत पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजप आणि सपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत जनतेला अनेक आश्वासने दिली होती.
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष (BJP) पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणार, हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंत आलेल्या निकालांवरून (UP Election Result) जवळपास स्पष्ट झाले आहे. मोठी आघाडी घेत भाजपने बहुमताचा आकडा गाठत सपाला मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. तर, मणीपूरमध्येही भाजपने कमळ फुलवल्याचं दिसून येतं. त्यामुळेच, आता निवडणुकांपूर्वी राजकीय पक्षांनी दिलेल्या वचनपूर्वीची वेळ आली आहे. कारण, मतदारांना जाहीरनाम्यातून दिलेला आश्वासनं त्यांना पाळावी लागणार आहेत.
युपीत पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजप आणि सपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत जनतेला अनेक आश्वासने दिली होती. एवढेच नाही, तर या दोन्ही पक्षांनी जनतेला अनेक गोष्टी मोफत देण्याचेही आश्वासन दिले होते. तिकडे पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांनीही अनेक आश्वासनं दिली आहेत. तर, मणीपूरमध्येही भाजपने मोफत स्कुटी देण्याचं वचन दिलं आहे. त्यामुळे, वचननामा देण्याऱ्या पक्षांकडून आता वचनपूर्तीची अपेक्षा मतदारांना आहे.
युपीत भाजपने दिलेली आश्वासने
शेतकऱ्यांना मोफत वीज - भाजपने पाच वर्षे सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. एवढेच नाही, तर भाजप सरकार आल्यास 14 दिवसांच्या आता उसाचे पेमेंट करण्यात येईल आणि विलंब झाल्यास व्याज देण्यात येईल, असे आश्वासनही भाजपने दिले आहे.
पेन्शनमध्ये वाढ - भाजपने विधवा आणि निराधार महिलांना मिळणारे पेन्शन 1500 रुपये प्रति महिना करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हे पेन्शन दरमहा एक हजार रुपये एढे आहे.
गरीब मुलिंना लग्नासाठी सहकार्य - मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत 15 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सामूहिक विवाह अनुदान योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
मोफत सिलिंडर - प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांना होळी आणि दिवाळीनिमित्त 2 मोफत एलपीजी सिलेंडर दिले जातील.
मोफत प्रवास - 60 वर्षांवरील महिलांना सार्वजनिक परिवहनने मोफत प्रवासाची सुविधा करून देण्यात येईल.
मोफत स्कूटी - राणी लक्ष्मीबाई योजनेंतर्गत महाविद्यालयीन गुणवंत विद्यार्थिनींना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने मोफत स्कूटी देण्याचे आश्वासन भाजपने केले आहे.
रोजगाराची व्यवस्था - भाजपने 5 वर्षांत 3 कोटींहून अधिक रोजगार देण्याचा दावा करत, पुढील पाच वर्षांत प्रत्येक कुटुंबात किमान एक रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल.
मोफत कोचिंग - अभ्युदय योजनेंतर्गत UPSC, UPPSC, NDA, CDS, JEE, NIIT, TET, CLAT, तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी इच्छूक तरुणांना मोफत कोचिंग सुविधा देण्यात येणार.
स्मार्टफोन आणि टॅबलेट - स्वामी विवेकानंद युवा सशक्तीकरण योजनेंतर्गत 2 कोटी टॅब्लेट आणि स्मार्टफोनचे वाटप केले जाणार.
पंजाबमध्ये आपने दिल्ली मॉडेल आणि महिलांना दरमहा 1 हजार रुपये
पंजाबमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पक्षाचं सरकार बनत आहे. पंजाबमधील नागरिकांना आपने अनेक वचनं दिली आहेत. त्यामध्ये, 18 वर्षे वय पूर्ण केलेल्या महिलांना दरमहा 1 हजार रुपये. नशामुक्त पंजाब बनवून महिलांना सुरक्षा. दिल्लीप्रमाणेच मोफत वीज आणि पाणी. राज्यात 16 हजार मुहल्ला क्लिनीक. महिलांना मोफत उपचार
उत्तराखंडमध्ये 2 हजार रुपयाचे वचन
महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी 3 गॅस सिलेंडर मोफत
गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत
दारिद्र रेषेखाली येणाऱ्या महिलांना दरमहा 2 हजार रुपयांची आर्थिक मदत
मणिपूरमध्ये विद्यार्थींनींना मोफत स्कुटी
उज्ज्वला लाभार्थींना वर्षातून 2 सिलेंडर मोफत
कॉलेज जाणाऱ्या सर्वच विद्यार्थींनींना मोफत स्कुटी
12 वी पास होताच लॅपटॉप
गरिब कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी 25 हजारांची मदत