नाशिकचे नितीन भालेराव छत्तीसगडमध्ये नक्षलींनी घडवलेल्या आयईडी स्फोटात शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 10:26 AM2020-11-29T10:26:24+5:302020-11-29T10:27:31+5:30

सुकमामधील हल्ल्यात ९ जवान जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

assistant commandant Nitin Bhalerao martyred in IED blast in Chhattisgarh | नाशिकचे नितीन भालेराव छत्तीसगडमध्ये नक्षलींनी घडवलेल्या आयईडी स्फोटात शहीद

नाशिकचे नितीन भालेराव छत्तीसगडमध्ये नक्षलींनी घडवलेल्या आयईडी स्फोटात शहीद

Next

रायपूर: छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी कोब्रा २०६ बटालियनवर आयईडीनं हल्ला केला. यामध्ये असिस्टंट कमांडेंट नितीन भालेराव यांना वीरमरण आलं आहे. तर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ९ जवान जखमी झाले आहेत. काल रात्री १० च्या सुमारास सीआरपीएफचे जवान ताडमेटला परिसरातल्या बुर्कापालपासून ६ किलोमीटर अंतरावर नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. 

आयईडी स्फोटात जखमी झालेले सर्व जवान कोब्रा २०६ बटालियनचे आहेत. सुकमाचे पोलीस अधीक्षक के. एल. ध्रुव यांनी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना हेलिकॉप्टरनं उपचारांसाठी रायपूरला आणण्यात आलं आहे. तर असिस्टेंट कमांडेंट नितीन भालेराव यांनी रुग्णालयात आणण्यापूर्वीच अखेरचा श्वास घेतला.




नितीन भालेराव हे मूळचे नाशिकचे आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरेंनी भालेराव यांच्या कंपनी कमांडरशी संवाद साधला आहे. सध्या भालेराव यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम सुरू आहे. त्यानंतर त्यांचं पार्थिव रायपूरहून विमानानं मुंबईला आणलं जाईल आणि तिथून ते नाशिकला आणण्यात येईल. त्यानंतर त्यांचे नातेवाईक निश्चित करतील, त्या वेळेनुसार त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामाने केला जाईल, अशी माहिती मांढरेंनी दिली.  

शनिवारी सुरक्षा दलाचे जवान ताडमेटला परिसरात नक्षलवाद्यांचा शोध घेत होते. सर्च ऑपरेशन सुरू असताना रात्री उशिरा काही जवान नक्षलवाद्यांनी तयार केलेल्या स्पाईक होल्समध्ये अडकून जखमी झाले. त्यानंतर काही जवान आयईडी स्फोटात जखमी झाल्याची माहिती समोर आली. त्यामध्ये १० जवान जखमी झाले. या जवानांवर सध्या उपचार सुरू आहेत.

Web Title: assistant commandant Nitin Bhalerao martyred in IED blast in Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.