लघुग्रह १९ हजार किलोमीटर वेगाने पृथ्वीजवळून निघून गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 05:25 AM2020-04-30T05:25:28+5:302020-04-30T05:25:40+5:30
सुमारे मैलाच्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीपासून फक्त ३.९ दशलक्ष किलोमिटर अंतरावरून गेला. हे अंतर सुमारे पृथ्वी आणि चंद्रांमधील अंतराच्या १६ पट इतके होते.
नवी दिल्ली : बुधवारी सकाळी (अमेरिकन वेळेनुसार १०.५६ वाजता) अंतराळात अनोखी घटना घडली. सुमारे मैलाच्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीपासून फक्त ३.९ दशलक्ष किलोमिटर अंतरावरून गेला. हे अंतर सुमारे पृथ्वी आणि चंद्रांमधील अंतराच्या १६ पट इतके होते. मात्र ५२७६८ किंवा १९९८ आरओ २ या नावाने ओळखला जाणारा हा लघुग्रह या शतकात पृथ्वीच्या आणखी जवळून जाईल, असेही नासाने म्हटले.
हा लघुग्रह २०७९ मध्ये पुन्हा पृथ्वीच्या जवळ येणार आहे. त्याच्या कक्षेसंदर्भात अभ्यास करण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांना ही घटना मोठी पर्वणी होती. या लघूग्रहाचे वर्गीकरण धोकादायक या गटात करण्यात असले तरी सध्या यापासून पृथ्वीला कोणताही धोका नसल्याचेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.
आॅस्ट्रेलियातील नॅशनल युनिर्व्हसिटीमधील खगोलशास्त्रज्ञ डॉ. बॅ्रड टकर म्हणाले,‘या लघूग्रहापासून पृथ्वीला कोणताही धोका नाही. हा लघूग्रह पृथ्वीवर आदळणार नाही. ही एक अशी आपत्ती आहे की जी पृथ्वीवर होणार नाही.’ ते म्हणाले, ‘हा मोठा असला तरी पृथ्वीवरून डायनासोर्सला नष्ट करणाऱ्या अॅस्ट्रॉईडपेक्षा लहानच आहे.
५०० फुटांपेक्षा मोठा आणि पाच दशलक्ष मैलापेक्षा कमी अंतरावरून जाणाºया कोणत्याही गोष्टीला ‘धोकादायक’ या गटात घातले जाते.
प्युर्टो रिको येथील डॉ. अॅने व्रिकी या लघूग्रहाचा अभ्यास करत आहेत. ते म्हणाले,‘धोकादायक लघूग्रहाचा अभ्यास करण्यासाठी व त्यापासूनचा धोका कमी करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या घटनेची मदत होऊ शकेल.’ या लघूग्रहाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ गमतीने म्हणाले की ‘या उपग्रहाच्या छायाचित्रातून असे दिसते की त्याने मास्क परिधान केलेला आहे.’ दशकातील महत्वाच्या घटनेसंदर्भातील सर्व दहा छायाचित्रे नासाने प्रसारित केली आहेत.
>59 वर्षे या अनोख्या घटनेचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांना वाट पाहावी लागणार आहे. डॉ. व्रिक्की म्हणाले, ‘ओआर २ वरील एका टोकाकडे छोट्या टेकड्या दिसतात.मात्र आपण सर्वजण कोविड १९ या महामारीला तोंड देत असल्यामुळे आपल्याला ते मास्क लावल्यासारखे दिसते.
खगोलीय घटनांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ फ्लावियान व्हेनडिटी म्हणाले,‘राडारवरुन घेण्यात आलेल्या मोजमापांमुळे भविष्यात अशा पृथ्वीजवळ येणाºया लघू ग्रहासंदर्भातील अभ्यास करण्यासाठी आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल.