निवडणूक भविष्यवाणी करण्यास ज्योतिषांनाही बंदी, निवडणूक आयोगाचा आदेश

By admin | Published: March 30, 2017 11:59 PM2017-03-30T23:59:24+5:302017-03-31T00:00:34+5:30

निवडणुकांदरम्यान आता कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल जारी करता येणार नाही. इतकंच नाही तर निवडणुकांविषयी भविष्यवाणी करण्यासही बंदी

Astrologers are also banned for the election, the Election Commission order | निवडणूक भविष्यवाणी करण्यास ज्योतिषांनाही बंदी, निवडणूक आयोगाचा आदेश

निवडणूक भविष्यवाणी करण्यास ज्योतिषांनाही बंदी, निवडणूक आयोगाचा आदेश

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - निवडणुकांदरम्यान आता कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल जारी करता येणार नाही. इतकंच नाही तर निवडणुकांविषयी भविष्यवाणी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत आदेश दिले आहेत. 
 
निवडणूक आयोगाने गुरूवारी निवडणूक निकालांबाबत ज्योतिषी, राजकिय पंडित किंवा टॅरो कार्ड रिडर्स यांच्या भविष्यवाणी करण्यावर अथवा अंदाज सांगण्यावर निर्बंध घातले आहेत. एक्झिट पोलवरील बंदी दरम्यान जर निवडणूक निकालांविषयी  काही भविष्यवाणी अथवा अंदाज वर्तवण्यात आला तर त्याला निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन मानलं जाईल. तसेच संबंधित व्यक्तिवर कडक कारवाई केली जाईल. 
 
नुकत्याच झालेल्या 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांदरम्यान एका न्यूज वेबसाइटने एक्झिट पोल जारी केला होता. त्यानंतर वेबसाइटच्या संपादकाला अटक करण्यात आली होती. पण नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.   त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियाला एक्झिट पोल जारी करण्यापासून दूर राहण्यास सांगितलं आहे. स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका पार पाडाव्या या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे

Web Title: Astrologers are also banned for the election, the Election Commission order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.