खगोलअभ्यासकांना पर्वणी; 21 व्या शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण या महिन्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 02:15 PM2018-07-14T14:15:14+5:302018-07-14T14:15:18+5:30
यापुर्वी 16 जुलै 2016 रोजी मोठे चंद्रग्रहण झाले होते. ते1 तास 46 मिनिटांचे होते तर 15 जून 2011 रोजी झालेले चंद्रग्रहण 1 तास 40 मिनिटांचे होते
नवी दिल्ली- 21 व्या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण जुलै महिन्यात पाहायला मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे हे चंद्रग्रहण भारतातील काही भागांमध्ये दिसणाऱ असून ते 1 तास 43 मिनिटांचे असेल. केंद्रीय अर्थ सायन्सेस मंत्रालयाने याची माहिती प्रसिद्ध केली आहे.
जुलै महिन्यात 27 व 28 तारखेला हे ग्रहण असेल. 27 जुलै रोजी रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी ग्रहणास सुरुवात होईल, हळूहळू संपूर्ण चंद्रावर पृथ्वीची छाया पसरले आणि 28 जुलै रोजी पहाटे ग्रहण संपेल. पहाटे 2 वाजून 43 मिनिटांनंतर चंद्रावरील सावली हळूहळू कमी होईल आणि 3 वाजून 49 मिनिटांनी चंद्र पूर्ण छायामुक्त होईल. यापुर्वी 16 जुलै 2016 रोजी मोठे चंद्रग्रहण झाले होते. ते1 तास 46 मिनिटांचे होते तर 15 जून 2011 रोजी झालेले चंद्रग्रहण 1 तास 40 मिनिटांचे होते.
27 जुलै रोजी मंगळ आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी येणार असून खगोलशास्त्राच्यादृष्टीने ही देखिल एक महत्त्वाची घटना आहे. मंगळ व पृथ्वी यांच्यामधील अंतर त्यावेळेस कमी झालेले दिसून येईल आणि त्यामुळे मंगळ अधिक तेजस्वी दिसेल. ग्रहण लागलेल्या चंद्राजवळ हा तेजस्वी मंगळ दिसून येईल आणि उघड्या डोळ्यांनी हा खगोलविज्ञानाचा आविष्कार सर्वांना पाहाता येईल असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.