शाळेत गुरुजी सहकारी शिक्षिकेसोबत करत होते अश्लील चाळे, विद्यार्थ्यांनी पाहिले, मग घरी सांगितले, ग्रामस्थ भडकले आणि मग..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 01:17 PM2022-03-04T13:17:42+5:302022-03-04T13:17:42+5:30
Teachers Affair: या विद्येच्या मंदिराला आणि शिक्षकी पेशाला कलंकित करणारी घटना राजस्थानमध्ये घडली आहे. येथे एका शाळेतील शिक्षक आणि शिक्षिकेने शाळेत केलेल्या अश्लील चाळ्यांमुळे शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जयपूर - शाळा हे विद्येचे मंदिर मानले जाते तर तिथे शिकवणारे शिक्षण हे वंदनीय असतात. मात्र या विद्येच्या मंदिराला आणि शिक्षकी पेशाला कलंकित करणारी घटना राजस्थानमध्ये घडली आहे. येथे एका शाळेतील शिक्षक आणि शिक्षिकेने शाळेत केलेल्या अश्लील चाळ्यांमुळे शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. शाळेतच सदर शिक्षिका आणि शिक्षकाला अश्लील चाळे करताना पाहून विद्यार्थीही लाजेने चूर झाले. त्यांनी हा प्रकार घरी जाऊन पालकांना सांगितले. त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शाळेला घेराव घालून या शिक्षकांना शाळेतून हटवण्याची मागणी केली. त्यानंतर प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत सदर शिक्षकांना शाळेतून हटवले. मुलांनीही या शिक्षकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना देवली ब्लॉकमधील श्रीनगर गावातील आहे. येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या दाव्यानुसार सरकारी शाळेत कार्यरत असलेले शिक्षक जगदीश मीणा आणि एक शिक्षिका दररोज अश्लील चाळे करत असत. ग्रामस्थांनी सांगितले की, मुले घरी येऊन शिक्षकांच्या चाळ्यांबाबत सांगतात. या प्रकारामुळे मुलांवर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या प्रकारामुळे संतप्त असलेल्या ग्रामस्थांनी बुधवारी शाळेकडे धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी शाळेच्या गेटला कुलूप लावून दोन्ही शिक्षकांना हटवण्याची मागणी केली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिले. त्यानंतर या प्रकाराची माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी तपासाचे आश्वासन दिले. मात्र ग्रामस्थांनी आरोपी शिक्षण आणि शिक्षिकेला हवण्याची मागणी लावून धरली.
अखेरीस हे प्रकरण प्रशासकीय पातळीवर एसडीएमपर्यंत पोहोचले. त्यानंतर दोन्ही शिक्षकांना तपास पूरण होईपर्यंत तत्काळ तिथून हटवण्याचे आदेश देण्यात आले. देवलीचे एसडीएम भारतभूषण गोयल यांनी सांगितले की, शिक्षकांच्या चाळ्यांमुळे संतप्त ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.