Atal Bihari Vajpayee Death: वाजपेयींच्या आयुष्याशी संबंधित 'या' सहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 06:54 PM2018-08-16T18:54:36+5:302018-08-16T20:24:01+5:30

Atal Bihari Vajpayee Death: भाजपाचे पहिले पंतप्रधान असलेल्या वाजपेयींना पक्षाला बहुमत मिळवून देता आलं नाही. मात्र सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे भारतीय राजकारणातील एक संयमी नेता अशी त्यांची ओळख आहे.

Atal Bihari Vajpayee Death: important and interesting facts about Atal Bihari Vajpayee | Atal Bihari Vajpayee Death: वाजपेयींच्या आयुष्याशी संबंधित 'या' सहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Atal Bihari Vajpayee Death: वाजपेयींच्या आयुष्याशी संबंधित 'या' सहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

googlenewsNext

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तीनवेळा देशाचे पंतप्रधान झाले. मात्र यापैकी केवळ एकदा त्यांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला. भाजपाचे पहिले पंतप्रधान असलेल्या वाजपेयींना पक्षाला बहुमत मिळवून देता आलं नाही. मात्र सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे भारतीय राजकारणातील एक संयमी नेता अशी त्यांची ओळख आहे. वाजपेयी यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टींवर एक नजर टाकूया...

1. पोखरणमधील अणू चाचणी: 
बहुतांश पंतप्रधानांनी भारताला महासत्ता करण्याची भाषा केली. मात्र अणूचाचणी करुन वाजपेयी यांनी जगाला भारताचं सामर्थ्य दाखवून दिलं. वाजपेयी पंतप्रधान असताना भारतानं पोखरणमध्ये एका पाठोपाठ एक पाच अणू चाचणी केल्या. अतिशय गोपनीयपणे या चाचण्या करण्यात आल्या होत्या. 
2. पाच वर्ष सत्तेत राहिलेले पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान:
अटल बिहारी वाजपेयी देशाचे असे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत, ज्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. याआधी कोणत्याही नेत्याला अशी कामगिरी करता आलेली नव्हती. 
3. चार राज्यांमधून निवडून गेलेले खासदार:
अटल बिहारी वाजपेयी अतिशय लोकप्रिय नेते आहेत. वाजपेयी यांच्या नावावर अनोखा विक्रम आहे. वाजपेयी चार राज्यांमधून लोकसभेवर गेले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि दिल्लीमधून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.
4. पहिल्यांदा आघाडी सरकारची स्थापना:
अटल बिहारी वाजपेयी देशाचे पहिले असे नेते होते, ज्यांना आघाडी सरकार स्थापन करण्यात यश आलं. त्यांनी केवळ सत्तास्थापन केली नाही, तर सर्वांना सोबत घेऊन पाच वर्षांचा कार्यकाळदेखील पूर्ण केला. यामुळे भारतीय राजकारणाला महत्त्वपूर्ण वळण मिळालं. 
5. संयुक्त राष्ट्रात हिंदीमध्ये भाषण :
अटल बिहारी वाजपेयी यांना हिंदीविषयी विशेष प्रेम वाटायचं. त्यामुळेच पंतप्रधान म्हणून संयुक्त राष्ट्राला संबोधित करताना त्यांनी हिंदीचा आधार घेतला. असं करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. 
6. भारतरत्न : 2015 मध्ये वाजपेयींना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न प्रदान करण्यात आला. त्यांच्यासोबत पंडित मदन मोहन मालवीय यांनाही हा पुरस्कार देण्यात आला. 

(Atal Bihari Vajpayee: पत्रकार ते पंतप्रधानपदापर्यंतचा अटल बिहारी वाजपेयींचा राजकीय प्रवास)

(Atal Bihari Vajpayee: जाणून घ्या, अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दलच्या १० दुर्मिळ गोष्टी)

(Atal Bihari Vajpayee: अटलबिहारींचा 'आठ'वावा प्रताप; या गोष्टींसाठी सदैव ऋणी राहील भारत!)

Web Title: Atal Bihari Vajpayee Death: important and interesting facts about Atal Bihari Vajpayee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.