Atal Bihari Vajpayee health Updates: 'त्यांनी फक्त एकदा बोलावं...' अटल बिहारी वाजपेयींच्या भाचीला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 12:02 PM2018-08-16T12:02:46+5:302018-08-16T12:05:43+5:30

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

Atal Bihari Vajpayee: 'He should speak only once ...' Atal Bihari Vajpayee's niece is tears | Atal Bihari Vajpayee health Updates: 'त्यांनी फक्त एकदा बोलावं...' अटल बिहारी वाजपेयींच्या भाचीला अश्रू अनावर

Atal Bihari Vajpayee health Updates: 'त्यांनी फक्त एकदा बोलावं...' अटल बिहारी वाजपेयींच्या भाचीला अश्रू अनावर

Next

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. वाजपेयी यांच्या प्रकृतीबाबत एम्स रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आले असून, गेल्या 24 तासांमध्ये त्यांची प्रकृती अधिकच खाल्यावल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्वाल्हेर आणि आग्र्याहून त्यांचे कुटुंबीय दिल्लीत दाखल झाले आहेत.

एम्सच्या जवळपास सकाळी 10 वाजल्यापासून खूप गर्दी आहे. तसेच भाजपानं आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. याच दरम्यान अटल बिहारी वाजपेयींच्या भाची कांती मिश्रा एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत करताना भावुक झाली. कांती म्हणाली, मी देवाकडे प्रार्थना करतेय की केवळ एकदा तरी मी त्यांना भाषण करताना पाहू शकेन. आमच्या कुटुंबीयांतल्या प्रत्येक सदस्याच्या मनात त्यांचं असलेलं स्थान कोणीही घालवू शकत नाही.


तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मांनाही अटल बिहारींची आठवण काढताना अश्रू अनावर झाले होते. वाजपेयी यांची प्रकृती खालावल्यानं नरेंद्र मोदी त्यांच्या भेटीसाठी एम्समध्ये पोहोचले आहेत. त्याआधी काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी वाजपेयींची भेट घेतली होती. न्याभरापूर्वीदेखील अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती खालावल्याचं एम्स रुग्णालयानं सांगितलं होतं. त्यावेळी त्यांना मूत्र संसर्ग झाला होता. त्यावेळी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी वाजपेयींची भेट घेतली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही वाजपेयींची भेट घेतली होती. 

Web Title: Atal Bihari Vajpayee: 'He should speak only once ...' Atal Bihari Vajpayee's niece is tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.