Atal Bihari Vajpayee: भारत इस्रायल संबंधांतील गुप्ततेची कोंडी फोडणारे पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 02:09 PM2018-08-16T14:09:18+5:302018-08-16T18:34:59+5:30

इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांचे भारतात स्वागत करण्याची संधी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना मिळाली.

Atal Bihari Vajpayee: Key Player Indo-Irsael Relationship | Atal Bihari Vajpayee: भारत इस्रायल संबंधांतील गुप्ततेची कोंडी फोडणारे पंतप्रधान

Atal Bihari Vajpayee: भारत इस्रायल संबंधांतील गुप्ततेची कोंडी फोडणारे पंतप्रधान

Next

मुंबई- भारत आणि इस्रायल यांच्यामधील सांस्कृतीक संबंध हजारो वर्षांचे असले तरी दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध अत्यंत उशिरा प्रस्थापित झाले. भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले तर त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 1948 साली इस्रायलची निर्मिती झाली. मात्र तरिही इस्रायलबाबत फारशी स्पष्ट भूमिका घेण्यात आली नव्हती. 1992 साली भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये राजनैतिक पातळीवरचे संबंध प्रस्थापित झाले.

जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत वाजपेयी हिंदीमध्ये बोलले...

इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांचे भारतात स्वागत करण्याची संधी तत्कालीन पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांना मिळाली. अटलबिहारी वाजपेयी यांनी इस्रायल भारत यांच्या संबंधांचे द्वार खुले केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर वेगाने आदानप्रदान होऊ लागले.

पत्रकार ते पंतप्रधानपदापर्यंतचा अटल बिहारी वाजपेयींचा राजकीय प्रवास

भारत-इस्रायल यांच्या संबंधांवर दृष्टीक्षेप
१९९२ - दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित
१९९७- इस्रायलचे राष्ट्रपती एझर वाइझमन यांची भारताला भेट
२०००- उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांची इस्रायलला भेट
२००३- इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांची भारतास भेट
२००६- तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार, कपिल सिब्बल, कमलनाथ यांची  इस्रायल भेट
२०१२- परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची इस्रायलला भेट
२०१४- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेत्यानाहू यांची न्यू यॉर्कमध्ये भेट. 
२०१४- टष्ट्वीटरवर नरेंद्र मोदी यांनी हिब्रूमधून हनुक्का या ज्यू सणाच्या शुभेच्छा दिल्या, त्याला नेत्यानाहूंचा हिंदीतून प्रतिसाद
२०१४- गृहमंत्री राजनाथ सिंह यांची इस्रायलला भेट
२०१५- इस्रायलचे परराष्ट्रमंत्री मोशे यालोन यांची भारत भेट (पंतप्रधानांशीही संवाद)
२०१५- भारताचे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांची पॅलेस्टाइन आणि इस्रायलला भेट. इस्रायलची संसद नेसेटमध्ये भाषण. असे भाषण देणारे व इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती
2017 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला भेट दिली. इस्रायलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान झाले.
त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2018मध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताला भेट दिली.
अटलबिहारी वाजपेयी आणि अरायल शेरॉन यांनी प्रस्थापित केलेले दोन देशांमधील सहसंबंधाचे नाते अधिकाधिक दृढ होत गेले.

हेमा मालिनीचे चाहते होते वाजपेयी, 25 वेळा पाहिला होता 'सीता और गीता' चित्रपट

Web Title: Atal Bihari Vajpayee: Key Player Indo-Irsael Relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.