Atal Bihari Vajpayee: वाजपेयींची प्रकृती चिंताजनक, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न - जेपी नड्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 04:34 PM2018-08-16T16:34:53+5:302018-08-16T16:35:34+5:30
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी एम्स रुग्णालयातील डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत, असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी दिली.
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी एम्स रुग्णालयातीलडॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत, असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी दिली.
एम्स रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी पत्रकारांना सांगितले की, अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. डॉक्टरांकडून अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तसेच, त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यासाठी काही वेळातच एम्स रुग्णालयाकडून बुलेटिन जारी करण्यात येणार असल्याचेही जेपी नड्डा यांनी सांगितले.
दरम्यान, अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अचानक खालावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या 36 तासांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत. केंद्रातील निम्मं मंत्रिमडळ रुग्णालयात आहे. वाजपेयी यांचे पुतणे अनुप मिश्रा, करुणा शुक्ला आणि कुटुंबांतील इतर सदस्यही रुग्णालयात आहेत. याचबरोबर, भाजपाशासित सर्वच राज्यांतील मुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना झाले आहेत.