Atal Bihari Vajpayee: अन् वाजपेयींनी मला अध्यक्ष केलं, शरद पवारांनी सांगितला 'अटल किस्सा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 10:54 AM2018-08-17T10:54:04+5:302018-08-17T11:12:50+5:30
Atal Bihari Vajpayee: सन 1996 साली वाजपेयींचे 13 दिवसांचे सरकार पडले. त्यावेळी मी काँग्रेसचा संसदीय नेता होतो. त्यामुळे मी संसदेत अविश्वास ठरावाच्याबाजूने आणि सरकारविरोधात भाषण केले. त्यावेळी, वाजपेयींनी
मुंबई - अटल बिहारी वाजपेयी हे अजातशत्रू व्यक्तीमत्व होते. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अटलजींबाबत एक गोष्ट नेहमीच सांगितली जाते ती म्हणजे, वाजपेयी विरोधकांचाही सन्मान ठेवत, विरोधकांचेही म्हणणे पूर्ण ऐकून घेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनीही वाजपेयींच्या या शैलीचे कौतूक करतानाचा एक किस्सा कथित केला आहे. 2002 च्या गुजरात भूंकपानंतर आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी अटलजींच्याच सरकारने माझी निवड केल्याची पवार यांनी म्हटले.
भरल्या ताटावरुन अटलजी उठले अन् लखनौ विमान अपहरणातील 48 भारतीयांचा जीव वाचला
पुलोदच्या काळात शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्याकाळात जनता पक्षाचाही पवारांना पाठिंबा होता. त्यामुळे पवार यांचे राजकीय कामकाजातून वाजपेयींशी संबंध आले, ते पुढे अधिकच घट्ट होत गेले. पवार यांनी वाजपेयींच्या सुसंस्कृत आणि सभ्यतेच्या राजकारणाबाबत बोलताना एक आठवण सांगितली आहे. सन 1996 साली वाजपेयींचे 13 दिवसांचे सरकार पडले. त्यावेळी मी काँग्रेसचा संसदीय नेता होतो. त्यामुळे मी संसदेत अविश्वास ठरावाच्याबाजूने आणि सरकारविरोधात भाषण केले. त्यावेळी, वाजपेयींनी माझे भाषण शांतपणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. मात्र, त्या रात्री मला फोन करुन माझ्याशी बोलणे केले. मी संसदेत केलेल्या भाषणाबद्दल अटलजींनी माझे कौतूक केले, असे आठवण पवार यांनी सांगितली आहे.
Atal Bihari Vajpayee : दिल्ली, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये आज शाळा-कॉलेज राहणार बंद
तसेच सन 2002 मध्ये गुजरातमध्ये मोठा भूकंप आला होता, त्यात मोठी हानी झाली होती. त्यावेळी केंद्रात भाजप आघाडीचे सरकार होते. महाराष्ट्रातील लातूरच्या भूंकपातील पुनवर्सनाचा मला अनुभव होता. त्यामुळे मी स्वत: अटलजींना गुजरातमध्ये पुनवर्सनासाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी, त्यांच्या काळात आपत्ती निवारण प्राधिकरण स्थापन करुन त्याच्या अध्यक्षपदी माझी निवड केली. विरोधी पक्षाच्या चांगल्या सूचनाही ते नेहमी आदराने आणि सन्माने स्विकारायचे असेही पवार यांनी सांगितले.