Atiq Ahmed Murder: अतिक अहमदला मारून व्हायचे होते फेमस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 07:33 AM2023-04-17T07:33:01+5:302023-04-17T07:33:33+5:30

Atiq Ahmed Murder:माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या मारेकऱ्यांना मोठ्या माफियांची हत्या करून उत्तर प्रदेशमध्ये  प्रसिद्ध व्हायचे होते. तीन आरोपींनी आपल्या जबाबात ही कबुली दिली आहे.

Atiq Ahmed Murder: Atiq Ahmed wanted to be famous | Atiq Ahmed Murder: अतिक अहमदला मारून व्हायचे होते फेमस

Atiq Ahmed Murder: अतिक अहमदला मारून व्हायचे होते फेमस

googlenewsNext

- राजेंद्र कुमार 
 प्रयागराज/लखनौ : माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या मारेकऱ्यांना मोठ्या माफियांची हत्या करून उत्तर प्रदेशमध्ये 
प्रसिद्ध व्हायचे होते. तीन आरोपींनी आपल्या जबाबात ही कबुली दिली आहे. तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.  

दाखल गुन्ह्यानुसार, हल्लेखोरांनी सांगितले की, अतिक-अशरफची हत्या करून त्यांना राज्यात प्रसिद्ध व्हायचे होते. पाेलीस बंदाेबस्ताचा अंदाज घेता आला नाही. त्यामुळे पळून जाण्यात अपयशी ठरले. न्यायालयाने दाेघांना पोलिस कोठडी दिली, तेव्हापासून ते प्रयागराजमध्ये होते. ते पत्रकार बनून स्थानिक माध्यमांच्या गराड्यात राहुन दाेघांना मारण्याच्या प्रयत्नात हाेते. मात्र, संधी मिळाली नाही. संधी मिळताच दाेघांना मारले. या हल्ल्यादरम्यान लवलेश हाही जखमी झाला आहे. या घटनेनंतर उमेश पाल यांच्या घराच्या सुरक्षेसाठी सुमारे १०० पोलिस कर्मचारी तैनात आहेत. गोळीबारात कॉन्स्टेबल मानसिंग हे जखमी झाले आहेत.  

मुलाच्या बाजूलाचअतिकचे दफन
शवविच्छेदनानंतर अतिक-अशरफ यांच्या मृतदेहांवर कडेकोट बंदोबस्तात प्रयागराजमधील कासारी मसारी स्मशानभूमीत अंत्यंस्कार झाले. त्यांना अतिकचा मुलगा असदच्या बाजुलाच दफन करण्यात आले. यावेळी मृतांचे काही दूरचे नातेवाईक उपस्थित होते.

Web Title: Atiq Ahmed Murder: Atiq Ahmed wanted to be famous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.