Atiq Ahmed Murder: अतिक हत्या प्रकरण कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पाच पोलिस निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 07:01 AM2023-04-20T07:01:47+5:302023-04-20T07:01:58+5:30
Atiq Ahmed Murder: कुख्यात गुंड अतिक अहमद व त्याचा भाऊ अश्रफ यांची गेल्या शनिवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे हत्या करण्यात आली. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शहागंज पोलिस ठाण्याचे प्रमुख अश्वनिकुमार सिंह यांच्यासहित पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
प्रयागराज : कुख्यात गुंड अतिक अहमद व त्याचा भाऊ अश्रफ यांची गेल्या शनिवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे हत्या करण्यात आली. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शहागंज पोलिस ठाण्याचे प्रमुख अश्वनिकुमार सिंह यांच्यासहित पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
अतिक व अश्रफला प्रयागराज येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. परतताना त्या दोघांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तीन हल्लेखोरांनी जवळून गोळ्या झाडून अतिक व अश्रफची हत्या केली. दोन्ही भावांच्या हातात बेड्या घातलेल्या होत्या. रुग्णालयातून कोठडीत नेत असताना पोलिसांनी नीट बंदोबस्त न राखल्याने हल्लेखोरांना वाव मिळाला व हत्या प्रकरण घडले, असे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीने म्हटले होते.
निलंबित करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये एक पोलिस उपनिरीक्षक, तीन कॉन्स्टेबलचा समावेश आहे. अतिक, अश्रफच्या हत्येची चौकशी करण्यासाठी पोलिस आयुक्त रमित शर्मा यांनी तीन अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.
हल्लेखोरांना पोलिस कोठडी
अतिक अहमद व अश्रफची हत्या करणाऱ्या लवलेश तिवारी, मोहित, अरुणकुमार मौर्य या तीन हल्लेखोरांना चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. (वृत्तसंस्था)