मुलगा असदशेजारीच अतिकचा दफनविधी; हत्याप्रकरणाचा पोस्टमार्टम रिपोर्टही आला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 02:52 PM2023-04-17T14:52:25+5:302023-04-17T14:59:33+5:30

अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या हत्येप्रकरणी २ एसआयटी स्थापन करण्यात आल्या आहेत.

Atiq ahmed's burial next to his son Asad; The post-mortem report of the murder case was received | मुलगा असदशेजारीच अतिकचा दफनविधी; हत्याप्रकरणाचा पोस्टमार्टम रिपोर्टही आला

मुलगा असदशेजारीच अतिकचा दफनविधी; हत्याप्रकरणाचा पोस्टमार्टम रिपोर्टही आला

googlenewsNext

प्रयागराज/लखनौ : माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या मारेकऱ्यांना मोठ्या माफियांची हत्या करून उत्तर प्रदेशमध्ये प्रसिद्ध व्हायचे होते. तीन आरोपींनी आपल्या जबाबात ही कबुली दिली आहे. तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर, दुसरीकडे अतिक अहमदचा दफनविधी करण्यात आला असून मुलगा असदच्या शेजारीच अतिकचा शव दफन करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाला समोर आला असून आरोपींनी अतिकवर ९ गोळ्या झाडल्या, तर अशरफवर ५ गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.  

अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या हत्येप्रकरणी २ एसआयटी स्थापन करण्यात आल्या आहेत. पहिली एसआयटी डीजीपी आर.के. विश्वकर्मा यांनी केली आहे. तर, दुसरी एसआयटी प्रयागराज कमिश्नर रमीत शर्मा यांनी नियुक्त केली आहे. तर, सरकारने न्यायिक आयोगही स्थापन केला आहे. त्यामुळे, याप्रकरणाची तीन स्तरावर चौकशी होणार आहे. 

दरम्यान, अतिक आणि अशरफ यांच्या हत्येचा शवविच्छेदन अहवाल हाती आला आहे. न्यूज एजन्सी ANI ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अतिकवर ९ गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, तर अशरफवर ५ गोळ्या झाडल्या गेल्या आहेत. या गोळ्या डोकं, छाती आणि पोटात मारण्यात आल्या. या दोघांचा पोस्टमार्टम ३ तास चालल्याचेही या अहवालातून समोर आले आहे. 

याप्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे, तिन्ही आरोपींना पोलीस रिमांडमध्ये पाठवण्यात येईल. त्यांना नैनी येथील हाय सिक्युरिटी तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. या तुरुंगाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. दुसरीकडे शहरातील तणाव आणि कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन प्रयागराजमध्ये आज इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येईल.  

पत्रकार बनून हल्लेखोरांचा हल्ला

याप्रकरणी दाखल गुन्ह्यानुसार, हल्लेखोरांनी सांगितले की, अतिक-अशरफची हत्या करून त्यांना राज्यात प्रसिद्ध व्हायचे होते. पोलीस बंदोबस्ताचा अंदाज घेता आला नाही. त्यामुळे पळून जाण्यात अपयशी ठरले. न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडी दिली, तेव्हापासून ते प्रयागराजमध्ये होते. ते पत्रकार बनून स्थानिक माध्यमांच्या गराड्यात राहुन दोघांना मारण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, संधी मिळाली नाही. संधी मिळताच दोघांना मारले. या हल्ल्यादरम्यान लवलेश हाही जखमी झाला आहे. या घटनेनंतर उमेश पाल यांच्या घराच्या सुरक्षेसाठी सुमारे १०० पोलिस कर्मचारी तैनात आहेत. गोळीबारात कॉन्स्टेबल मानसिंग हे जखमी झाले आहेत.  

मुलाच्या बाजूलाच अतिकचे दफन

शवविच्छेदनानंतर अतिक-अशरफ यांच्या मृतदेहांवर कडेकोट बंदोबस्तात प्रयागराजमधील कासारी मसारी स्मशानभूमीत अंत्यंस्कार झाले. त्यांना अतिकचा मुलगा असदच्या बाजुलाच दफन करण्यात आले. यावेळी मृतांचे काही दूरचे नातेवाईक उपस्थित होते.
 

Web Title: Atiq ahmed's burial next to his son Asad; The post-mortem report of the murder case was received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.