Atiq Ashraf Murder: अतिक-अश्रफ यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर 'जय श्री राम'चा नारा का दिला? शुटर सनीने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 11:45 AM2023-04-20T11:45:59+5:302023-04-20T11:46:46+5:30
Atiq Ashraf Murder Case: उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यातील अटकेत असलेले अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांच्या हत्येनंतर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
Atiq Ashraf Murder Case: उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यातील अटकेत असलेले अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांच्या हत्येनंतर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. विरोधी पक्षांनी आता य मुद्द्यावरुन सरकारला घेरले आहे. या तीनही आरोपींना गोळ्या झाडून का मारण्यात आले असा सवाल उपस्थित केला जात आहे, अतीक अहमद आणि अश्रफ यांची पोलिसांच्या संरक्षात असतानाच गोळ्या झाडून हत्या केली, यावेळी आरोपींनी जय श्री रामच्या घोषणाही दिल्या. आता या घोषणा का दिल्या याच उत्तर पोलिसांना मिळाले आहे. शुटर सनी याने या घोषणा का दिल्या याचा खुलासा केला आहे.
अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांना गोळ्या घालण्यात आल्या, तेव्हा रुग्णालयाबाहेर मीडिया कर्मचार्यांचा जमाव जमला होता. या सर्व प्रकारात तिघेही आरोपी लपून बसले आणि त्यांनी लगेच बाहेर येऊन अतिक आणि अश्रफ यांच्यावर गोळीबार केला. शूटर सनी याने पोलिसांना सांगितले की, तिघेही मरायला आले नाव्हते म्हणून त्यांनी आत्मसमर्पण केले आणि गोळीबार केल्यानंतर ते खूप घाबरले होते म्हणून त्यांनी 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या.
हत्येतील तिन्ही आरोपींची पोलिसांनी ८ तास चौकशी केली. यादरम्यान त्यांच्याकडून अनेक गुपिते उघड झाली. चौकशीदरम्यान लवलेश तिवारीने स्वतःला कट्टर हिंदूत्ववादी असल्याचे सांगितले. पोलीस रुग्णालयाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. तिघेही ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही घेण्यात येणार आहेत.
हत्येनंतर 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यावर विरोधकांचा आक्षेप
अतिक आणि अश्रफ या दोघांच्या हत्येनंतर आरोपींनी जय श्री रामच्या घोषणा दिल्याबद्दल विरोधी पक्षांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही याबाबत वक्तव्य केले होते. हिमाचल प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह म्हणाले होते की, जय श्री रामचा जयघोष करून कोणालाही ठार मारणे योग्य नाही, भले तो गुन्हेगार असला तरी. आपला देश कायदा आणि सुव्यवस्थेवर चालतो, जंगलराजवर नाही, असंही ते म्हणाले.