Atiq-Ashraf Murder: 'अतिक-अशरफची हत्या करणारे धर्मांध, त्यांना थांबवले नाही तर...' ओवेसी संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 06:16 PM2023-04-21T18:16:32+5:302023-04-21T18:18:23+5:30
Owaisi on Atiq-Ashraf Murder: हत्यारे गोडसेच्या वाटेवर चालणारे, दहशतवादी मॉड्यूलचा भाग आहेत.
Atiq-Ashraf Murder Case: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्या हत्येप्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी अतिक आणि अश्रफ यांची हत्या करणारे लोक धर्मांध असल्याचे म्हटले आहे. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या विचारसरणीवर त्यांचा विश्वास आहे, अशा मारेकऱ्यांवर आळा घातला नाही तर ते आणखी लोकांना मारतील, असेही ओवेसी म्हणाले.
Hyderabad, Telangana | People in police custody were killed; the people who killed them were terrorists and a terror module. They might kill more people. Why didn’t they invoke UAPA on those who killed them? Who gave automatic weapons to the killers? Who gave Rs 8 lakhs worth of… pic.twitter.com/M2bwyczCyR
— ANI (@ANI) April 21, 2023
तेलंगणातील एका कार्यक्रमाला संबोधित करताना AIMIM प्रमुख ओवेसी म्हणाले की, सरकारने मारेकऱ्यांवर UAPA गुन्हा का दाखल केला नाही? तिघा मारेकऱ्यांकडे महागाडी आधुनिक शस्त्रे कशी आली? हे मारेकरी धर्मांध असून ते गोडसेच्याच वाटेवर चालणारे आहेत. जर त्यांना थांबवले नाही तर ते आणखी लोक मारतील. हे लोक दहशतवादी मॉड्यूलचा भाग आहेत, असेही ते म्हणाले.
युपीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडली - शिवपाल
दरम्यान, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवपाल सिंह यादव यांनी अतिक-अशरफ यांच्या हत्येसाठी योगी सरकारला जबाबदार धरले आहे. शिवपाल यादव म्हणाले की, उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था आणि गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. कोणत्याही गुन्हेगाराला शिक्षा करणे हे न्यायालयाचे काम आहे. अशा घटना घडल्या तर न्यायालयाचा काय अर्थ राहणार आहे.
गेल्या शनिवारी अतिक-अशरफची हत्या झाली
अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गेल्या शनिवारी पोलिस कोठडीत तीन जणांनी हत्या केली होती. पत्रकार म्हणून आलेल्या तीन मारेकऱ्यांनी अतिक आणि अशरफ यांच्यावर जवळून गोळीबार केला. हत्येपूर्वी अतिक आणि अशरफ यांना प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले होते.