अतिक अहमदच्या जवळच्यांचे फोन अचानक बंद, सर्व्हिलान्सवरील 3000 मोबाईलवर NO RESPONSE!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 11:55 AM2023-04-21T11:55:55+5:302023-04-21T11:58:33+5:30
हे सर्व फोन अचानक बंद झाले आहेत. तपास यंत्रणेच्या रडारवर येण्याच्या भीतीने हे फोन बंद करण्यात आल्याचे समजते.
अतिक-अशरफ हत्या प्रकरणाशी संबंधित एक मोठी बातमी आहे. माफियाशी संबंधित लोक आणि अतिक-अशरफच्या जवळच्या व्यक्तींचे फोन अचानक बंद झाले आहेत. तपास यंत्रणेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अतिकशी संबंधित शेकडो लोकांचे फोन सर्व्हिलान्सलर घेण्यात आले होते, ज्यात अतिक गँगचे अनेक सदस्य आणि शुटर्सचा समावेश होता. हे सर्व फोन अचानक बंद झाले आहेत. तपास यंत्रणेच्या रडारवर येण्याच्या भीतीने हे फोन बंद करण्यात आल्याचे समजते.
सर्व्हिलान्सवर घेतलेले 3,000 फोन अचानक बंद झाले. हे फोन नंबर वेगवेगळ्या राज्यात कार्यरत होते, पण आता ते बंद करण्यात आले आहेत. गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे मित्र, नातेवाईक आणि गँगमधील सदस्यांचे फोन नंबर तपासण्यात आले. लखनौ, प्रयागराज, दिल्ली, बाराबंकी, कानपूर, गाझियाबाद, नोएडा, अजमेर, शाहजहानपूर, झांसी, हरदोई, बरेली, सहारनपूर, पटना, रांची आणि रायपूरसह 22 जिल्ह्यांमध्ये फोन नंबर स्विच ऑफ आहेत. दुसरीकडे, अतिक अहमदच्या हत्येचे रहस्य गुंतागुंतीचे आहे. उदाहरणार्थ, असदच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये, अतिकच्या हत्येचा आरोप असलेला शूटर अरुण मौर्य हा देखील सदस्य होता.
दरम्यान, हा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे, ज्याचे सूत्र पोलिसांना गुड्डू मुस्लिम आणि शाइस्ता परवीनपर्यंत पोहोचवू शकतात. विशेष म्हणजे, 15 एप्रिलच्या रात्री मृत्यूपूर्वी अशरफने काहीतरी उघड करण्याचा प्रयत्न केला, त्याने गुड्डू मुस्लिमचे नाव घेतले होते. तसेच, उमेश पालच्या हत्येच्या प्लॅनिंगसोबतच अतिक गँगची लेडी डॉन म्हणजेच त्याची पत्नी शाइस्ता हिने गँगची कमान सांभाळण्यास सुरुवात केली होती, हे निश्चित. या नियोजनादरम्यान अतिकचा मुलगा असद यानेही मोठी भूमिका बजावण्यास सुरुवात केली होती.
शेर-ए-अतिकशी काय संबंध अशू शकतो?
अतिक तुरुंगात राहिल्यामुळे शाइस्ता गँगमध्ये असदचा प्रभाव वाढवण्याच्या हालचाली सुरू होत्या आणि याच दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला, ज्याच्या संबंध अतिकच्या हत्येशी जोडल्या जात आहेत. खरंतर, व्हॉट्सअॅपवर शेर-ए-अतिक नावाचा एक ग्रुप तयार करण्यात आला होता, ज्यामध्ये अतिकच्या हत्येतील एक आरोपी अरुण मौर्य देखील सामील होता आणि गुड्डू मुस्लिम देखील त्याचा भाग असू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. अतिकशी संबंधित सर्व माहिती या ग्रुपमध्ये शेअर करण्यात आली होती. ज्यांच्यावर हल्लेखोर अरुणची नजर होती. या ग्रुपमध्ये राहूनच त्याने अतिकच्या हत्येचा कट रचला असण्याची शक्यता आहे.