१८ वर्ष लागली, नववधूचा शाप खरा ठरला! विवाहाच्या नवव्या दिवशी अतिकने केला होता पतीचा मर्डर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 11:15 AM2023-04-17T11:15:45+5:302023-04-17T11:17:57+5:30

Atiq Ahmed: नेमकं प्रकरण काय होतं? कधी घडली होती घटना? जाणून घ्या...

atique ahmed history people said pooja raju pal curse proved true after 18 years | १८ वर्ष लागली, नववधूचा शाप खरा ठरला! विवाहाच्या नवव्या दिवशी अतिकने केला होता पतीचा मर्डर

१८ वर्ष लागली, नववधूचा शाप खरा ठरला! विवाहाच्या नवव्या दिवशी अतिकने केला होता पतीचा मर्डर

googlenewsNext

Atiq Ahmed: प्रयागराजमध्ये माफिया, राजकारणी अतिक अहमद याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दोन आठवड्यांपूर्वी उमेश पाल हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कोठडीत असताना त्याची संरक्षण देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांनी गेल्या ४० वर्षांपासून असलेली दहशत संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. यातच आता एका नववधूने दिलेला शाप तब्बल १८ वर्षांनंतर खरा ठरल्याचे म्हटले जात आहे. या महिलेच्या पतीची विवाहाच्या नवव्या दिवशी अतीक अहमदने हत्या केली होती. 

अतिक आणि अशरफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. काहीच दिवसांपूर्वी अतिकचा मुलगा अदसचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला होता. तीन दिवसातच अतिकचे कुटुंबच नेस्तनाबूत झाले. या निमित्ताने १८ वर्षांपूर्वीच्या घटनेचा वारंवार उल्लेख होत आहे. अतिकच्या परिवाराला एका महिलेने शाप दिला होता. माझ्या पतीला ज्याप्रमाणे घेरून गोळीबारात ठार करण्यात आले. तसाच मृत्यू एक दिवस तुझ्याही वाट्याला येईल, या शब्दांत संताप व्यक्त केला होता. अतिकच्या हत्येनंतर या महिलेचा शाप खरा ठरल्याचे म्हटले जात आहे.

राजू पाल यांच्या पत्नीने दिला होता शाप

ही घटना सन २००५ मधील असल्याचे सांगितले जात आहे. प्रयागराज पश्चिम विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक होती. अतिकने त्याचा भाऊ अशरफला निवडणुकीत उतरवले होते. अशरफसमोर बसपाचे राजू पाल निवडणुकीच्या रिंगणात होते. राजू पाल यांनी ही विधानसभेची पोटनिवडणूक जिंकली. त्यानंतर काहीच दिवसांत राजू पाल यांचा विवाह झाला. पराभूत झालेल्या अतिक अहमद आणि अशरफ यांना राजू पाल यांचा विजय सहन झाला नाही. त्यांनी राजू पालची हत्या करण्याचा प्लॅन आखला. २५ जानेवारी २००५ रोजी धूमनगंज या ठिकाणी राजू पालला गुंडांनी घेरले आणि तिथेच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या भीषण हत्याकांडाने प्रयागराज हादरले. राजू पाल यांच्या पत्नी पूजा पाल यांच्या हातावरची मेहंदी गेली नव्हती. विवाहाच्या नवव्या दिवशीच तिच्या पतीची खुलेआम हत्या करण्यात आली. त्याच दिवशी पूजा पालने अतिक आणि त्याच्या कुटुंबाला शाप दिला होता. 

अतिक आणि त्याच्या गुंडांनाही एक दिवस असेच मरण येईल

अतिक आणि त्याच्या गुंडांनाही एक दिवस असेच मरण येईल, जसे माझ्या पतीला आले. एक ना एक दिवस देव त्यांच्या कर्माचे फळ त्यांना देईल, असा संताप पूजा पाल यांनी व्यक्त केला होता. १८ वर्षानंतर शनिवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर राजू पाल हत्याकांडावर अधिक चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे. अतिक आणि अशरफ यांच्या मृत्यूनंतर पूजा पाल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. जैसा करता है वैसाही भरता है. इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते. माणसाच्या कर्माचे फळ इथेच भोगून जावे लागते, असे त्या म्हणाल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: atique ahmed history people said pooja raju pal curse proved true after 18 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.