"अरविंद केजरीवालांना अटक ही भाजपाची मोठी चूक; जनता हुकूमशाही संपवेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 10:24 AM2024-04-12T10:24:34+5:302024-04-12T10:30:20+5:30
Arvind Kejriwal And BJP : आतिशी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे दिल्लीतील लोक अत्यंत संतप्त आहेत. लोकसभा निवडणुकीत ते भाजपाला चोख प्रत्युत्तर देतील असं म्हटलं आहे.
दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे दिल्लीतील लोक अत्यंत संतप्त आहेत. लोकसभा निवडणुकीत ते भाजपाला चोख प्रत्युत्तर देतील असं म्हटलं आहे. कालकाजी भागात 'जेल का जवाब, वोट से' मोहिमेअंतर्गत एका कार्यक्रमात आतिशी म्हणाल्या की, "मुख्यमंत्री केजरीवाल यांना 'खोट्या' प्रकरणात अटक करण्यात आल्याचं राजधानीतील लोकांना समजलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अटकेबद्दल असंतोष व्यक्त करणाऱ्या लोकांकडून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. "केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला आपलं कुटुंब मानलं आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला त्यांच्या "कारस्थाना" चे परिणाम भोगावे लागतील. दिल्लीतील लोक केजरीवालांवर प्रेम करतात कारण त्यांना माहीत आहे की, त्यांनी सरकारी शाळांचे जागतिक दर्जाच्या संस्थांमध्ये 'परिवर्तन' केले आहे आणि सामान्य लोकांच्या मुलांना 'उत्कृष्ट' शिक्षण दिले आहे."
"केजरीवाल दिल्लीला मानतात कुटुंब"
"अरविंद केजरीवाल हे असे आहेत ज्यांनी दोन कोटी दिल्लीकरांना आपलं कुटुंब मानले आणि त्यांना उत्कृष्ट आरोग्य सेवा दिली आणि उत्कृष्ट रुग्णालये आणि मोहल्ला क्लिनिकची व्यवस्था केली. त्यांनीच दिल्लीतील जनतेला चांगल्या सुविधा दिल्या आहेत."
"देशातील जनता 'हुकूमशाही' संपवेल"
"दिल्लीच्या 'लोकप्रिय' मुख्यमंत्र्यांची भाजपा आणि केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली अटक ही 'मोठी चूक' आहे. त्यामुळे देशातील जनता 'हुकूमशाही' संपवेल" असंही आतिशी यांनी म्हटलं आहे. या मोहिमेदरम्यान आतिशी यांनी लोकांची भेट घेतली आणि आम आदमी पार्टीसाठी समर्थन मागितलं आहे. ED ने 21 मार्च 2024 रोजी सीएम अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती.