एटीएमवरही होऊ शकतो सायबर हल्ला

By admin | Published: May 15, 2017 12:29 AM2017-05-15T00:29:10+5:302017-05-15T00:29:10+5:30

आंध्र प्रदेश पोलिसांच्या १०२ सिस्टीमला हॅकर्सने हॅक केल्यानंतर देशातील सायबर हल्ल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ATM can be a cyber attack | एटीएमवरही होऊ शकतो सायबर हल्ला

एटीएमवरही होऊ शकतो सायबर हल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आंध्र प्रदेश पोलिसांच्या १०२ सिस्टीमला हॅकर्सने हॅक केल्यानंतर देशातील सायबर हल्ल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. देशातील ७० टक्के एटीएम सायबर हल्ल्याची शिकार होऊ शकतात. कारण, या एटीएममध्ये आउटडेटेड झालेल्या विंडोज एक्सपीचा उपयोग करण्यात येतो. या सिस्टीमचे नियंत्रण त्या विक्रेत्यांकडे असते जे बँकेला ही सिस्टीम पुरवितात.
मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपीला सपोर्ट करणे बंद केलेले आहे. आंध्रातील सायबर अ‍ॅटॅकनंतर मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपीसाठी अपडेट रीलीज केले आहेत. जर भारतातील एटीएमला सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य केले तर परिस्थिती किती बिकट होऊ शकते याचा अंदाज कोणी लावू शकत नाही.
पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सायबर सुरक्षा सल्लागार गुलशन राय यांनी सांगितले की, अशा १०० सिस्टीमवर हल्ला झाला होता. पण, आता कोणताही धोका नाही. सायबर हल्लेखोर या डेटाला इनस्क्रिप्ट करून लॉक करतात. डेटाला डिक्रिप्ट करण्यासाठी ते रक्कम मागतात. चेन्नईच्या बाहेरच्या भागातील निस्सान - रेनॉल्ट या कंपनीचे उत्पादन सायबर हल्ल्यामुळे बंद करण्यात आले होते, असे सांगण्यात येत आहे. पण, कंपनीने यावर काही भाष्य केले नाही.
सरकारी आकडेवारीनुसार, गत १२ ते १४ महिन्यांत भारतात ११ हजार नेटवर्कविरुद्ध हल्ले झाले आहेत. भारत त्या ९९ देशांपैकी एक आहे
ज्या देशात अधिकाधिक सायबर हल्ले होतात.

Web Title: ATM can be a cyber attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.