दुसऱ्या बँकेचं एटीएम वापरताय? जास्त शुल्क मोजण्यास तयार रहा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 12:48 PM2018-04-19T12:48:35+5:302018-04-19T12:48:35+5:30

सध्या यासाठी प्रति व्यवहारामागे 15 रुपये आकारले जातात

atm operators seek higher interchange rates customers likely hit | दुसऱ्या बँकेचं एटीएम वापरताय? जास्त शुल्क मोजण्यास तयार रहा

दुसऱ्या बँकेचं एटीएम वापरताय? जास्त शुल्क मोजण्यास तयार रहा

Next

मुंबई: एटीएम वापरकर्त्यांकडून जास्त शुल्क आकारणी करण्याची मागणी एटीएम ऑपरेटर्सनी केली आहे. रिझर्व्ह बँकेनं एटीएम व्यवस्थापनाबद्दल काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी एटीएम वापरावरील शुल्क वाढवण्यात यावं, अशी ऑपरेटर्सची मागणी आहे. त्यामुळे ग्राहकानं दुसऱ्या बँकेचं एटीएम वापरल्यास त्याला 3 ते 5 रुपयांचं अतिरिक्त शुल्क मोजावं लागेल.

सध्या सर्व बँका इतर बँकेच्या ग्राहकांनी त्यांचं एटीएम वापरल्यास त्यासाठी प्रति व्यवहारामागे 15 रुपये आकारतात. दर महिन्याला पाचवेळा ग्राहकांना इतर बँकेच्या एटीएमचा वापर विनाशुल्क करता येतो. मात्र त्यानंतर एटीएममधून केल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यवहारासाठी 15 रुपयांचं शुल्क द्यावं लागतं. या शुल्कात वाढ केली जावी, अशी मागणी एटीएम ऑपरेटर्सकडून केली जात आहे. ही मागणी मान्य झाल्यास दुसऱ्या बँकेचं एटीएम वापरताना अधिक शुल्क द्यावं लागेल. 

एटीएम वापरावरील शुल्क 3 ते 5 रुपयांनी वाढवण्यात यावं, अशी मागणी सीएटीएमआयनं केली आहे. एटीएम ऑपरेटर्सला महागाईचा सामना करावा लागत असल्याचं सीएटीएमआनं म्हटलं आहे. 'रिझर्व्ह बँकेनं एटीएम ऑपरेटर्ससाठी अतिशय कठोर निकष लागू केले आहेत. या निकषांची पूर्तता करायची झाल्यास एटीएम व्यवस्थापनासाठी येणारा खर्च वाढेल,' असं सीएटीएमआयचे संचालक के. श्रीनिवास यांनी सांगितलं. रोकड व्यवस्थापनासाठी रिझर्व्ह बँकेनं नवे नियम घालून दिले आहेत. याची अंमलबजावणी जुलैपासून केली जाणार आहे. या नियमांची अंमलबजावणी करताना खर्च वाढेल, असा सूर एटीएम ऑपरेटर्सनी लावला आहे. 
 

Web Title: atm operators seek higher interchange rates customers likely hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम