एटीएममधून आता एका वेळेस काढता येणार 4,500 रुपये

By admin | Published: January 1, 2017 10:12 AM2017-01-01T10:12:34+5:302017-01-01T22:48:19+5:30

चलनातून बाद करण्यात आलेल्या 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना देण्यात

ATMs can now be withdrawn at 4,500 rupees | एटीएममधून आता एका वेळेस काढता येणार 4,500 रुपये

एटीएममधून आता एका वेळेस काढता येणार 4,500 रुपये

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 -   अडीच हजारांऐवजी एटीएमएमधून तुम्हाला आता साडेचार हजार रुपये काढता येणार आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे.  मात्र आठवड्याला बँक खात्यातून 24 हजार रुपये काढण्याची मर्यादा कायम ठेवली आहे.
चलनातून बाद करण्यात आलेल्या 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली 30 डिसेंबरला संपली आहे. मात्र या काळात नोटा बदलून घेण्यात अपयशी ठरलेल्या अनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेने नोटा बदलून घेण्याची मुदत वाढवून दिली आहे. 
रिझर्व्ह बँकेने शनिवारी रात्री याबाबतची  घोषणा केली आहे. या निर्णयानुसार जे भारतीय नागरिक 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या काळात देशाबाहेर होते, त्यांना 31 मार्च 2017 पर्यंत नोटा बदलून घेता येणार आहेत. तर अनिवासी भारतीयांना 30 जूनपर्यंत नोटा बदलून घेण्याची मुदत रिझर्व्ह बँकेने दिली आहे. 
 मात्र या निर्णयानुसार भारतीय नागरिकांवर नोटा बदलून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे बंधन घालण्यात आलेले नाही. पण अनिवासी भारतीयांना मात्र फेमा कायद्यानुसार प्रतिव्यक्ती 25 हजार एवढीच रक्कम बदलून घेण्याचे बंधन आहे. 

Web Title: ATMs can now be withdrawn at 4,500 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.