एटीएसने केले इसिसचे संकेतस्थळ बंद

By admin | Published: April 29, 2016 02:26 AM2016-04-29T02:26:02+5:302016-04-29T02:26:02+5:30

(इसिस) विचारांचा प्रचार करीत असल्याबद्दल दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) नाऊरू या छोट्या बेटासारख्या देशातील संकेतस्थळ (वेबसाईट) बंद (ब्लॉक) केले आहे.

ATS has blocked its website | एटीएसने केले इसिसचे संकेतस्थळ बंद

एटीएसने केले इसिसचे संकेतस्थळ बंद

Next

डिप्पी वांकाणी,

मुंबई- इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाच्या (इसिस) विचारांचा प्रचार करीत असल्याबद्दल दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) नाऊरू या छोट्या बेटासारख्या देशातील संकेतस्थळ (वेबसाईट) बंद (ब्लॉक) केले आहे. आॅस्ट्रेलियाच्या उत्तर-पूर्वेकडे हा नाऊरू देश आहे. एटीएसने आणखी तीन संकेतस्थळे ब्लॉक केली आहेत. त्यात आॅस्ट्रेलियन इस्लामी उपदेशक मुसा सेरॅनतोनिओची (३०) प्रवचने प्रसिद्ध केलेले आणि दुसरे ‘अल कायदा’च्या विचारसरणीचा प्रचार करणाऱ्या संकेतस्थळांचा समावेश आहे. एटीएसने ९४ संकेतस्थळे ब्लॉक केल्याचे वृत्त सगळ््यात आधी ‘लोकमत’ने दिले होते. त्यात इंडोनेशियात तयार झालेल्या एकाचा समावेश होता. ताज्या तीन संकेतस्थळांसह आता ब्लॉक करण्यात आलेल्यांची संख्या ९७ झाली आहे.  या संकेतस्थळाचे डोमेन नाऊरू येथे नोंदणी (रजिस्टर्ड) झालेले आहे. नाऊरुचे आधीचे नाव प्लिझंट आयलँड असून हा देश सेंट्रल पॅसिफिकमधील मायक्रोनेशियात आहे.
‘‘इसिसमध्ये भारतीय तरुणांनी सहभागी होण्यासाठी या संकेतस्थळाने प्रचार करून प्रभाव निर्माण केला म्हणून आम्ही ते बंद केले. भारतातून काही लोक तिकडे गेल्यामुळे आम्ही ते ब्लॉक केले असे एटीएसच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच संकेतस्थळही ब्लॉक करण्यात
आले आहे. सेरॅनतोनिओ हा आॅस्ट्रेलियन इस्लामी प्रवचनकार आहे. सिरियातील विदेशी अतिरेक्यांना स्फूर्ती देणाऱ्या इंग्रजी भाषिक दोन ‘अध्यात्मिक अधिकाऱ्यांपैकी’ हा एक आहे, असे वर्णन इंटरनॅशनल सेंटर फॉर द स्टडी आॅफ रॅडिकलायझेशनने (आयसीएसआर) केले आहे. सेरॅनतोनिओचे टिष्ट्वटर आणि फेसबुक अकाऊंट बंद करण्यात आले असले तरी त्याचे अनेक व्हिडिओज युट्यूबवर अजूनही उपलब्ध आहेत. सध्या तो आॅस्ट्रेलियात पोलिसांच्या निगरानीखाली आहे. त्याचा जन्म आॅस्ट्रेलियात आयरिश-कॅथॉलिक दाम्पत्याच्या पोटी झाला. तेथेच मोठा झाला. तो १७ वर्षांचा असताना त्याने इस्लाम धर्म स्वीकारला.
अल कायदाचे मुखपत्र असलेल्या ‘इन्स्पायर मॅगझिन’च्या १२ व्या अंकाची लिंक एटीएसने
ब्लॉक केली आहे. हे मासिक दहशतवादी संघटनेशी संबधित असून
तिच्या विचारांचा प्रचारच
करते असे नाही तर विदेशांतील तरुणांना आमिष दाखवते, असे हा अधिकारी म्हणाला. तत्पूर्वी, एटीएसने संकेतस्थळ ब्लॉक केले. हे इंडोनेशियात नोंदणी झालेले होते.
>नाऊरू : जगातील सर्वांत छोटा स्वतंत्र देश
पश्चिम पॅसिफिकमध्ये असलेले नाऊरू जगात जे स्वतंत्र देश आहेत त्यात सगळ््यात छोटे असून त्याचा विस्तार २१ चौरस किलोमीटर आहे. संयुक्त राष्ट्रांनुसार त्याची लोकसंख्या (२००५ नुसार) अंदाजे १३ हजार. त्याच्या संसदेचे सदस्य १८ असून कायदे करण्याचे अधिकार संसदेला आहेत. निवडल्या गेलेल्या सदस्यांची मुदत तीन वर्षांची असते. १४ सप्टेंबर १९९९ रोजी नाऊरूचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश झाला.

Web Title: ATS has blocked its website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.