मालेगाव आरोपीच्या घरात एटीएसने आरडीएक्स ठेवले! सुप्रीम कोर्टाने दिला एनआयएचा दाखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 03:28 AM2017-08-22T03:28:27+5:302017-08-22T03:28:45+5:30
मालेगाव येथे सप्टेंबर २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील एक आरोपी सुधाकर चतुर्वेदी याच्या देवळाली येथील घरात सापडलेले कथित आरडीएक्स महाराष्ट्र एटीएसचे एक पोलीस निरीक्षक बागडे यांनी तेथे नेऊन ठेवले असावे, या शक्यतेची दखल सर्वोच्च न्यायालयाने आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यास जामीन मंजूर करताना सोमवारी घेतली.
नवी दिल्ली : मालेगाव येथे सप्टेंबर २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील एक आरोपी सुधाकर चतुर्वेदी याच्या देवळाली येथील घरात सापडलेले कथित आरडीएक्स महाराष्ट्र एटीएसचे एक पोलीस निरीक्षक बागडे यांनी तेथे नेऊन ठेवले असावे, या शक्यतेची दखल सर्वोच्च न्यायालयाने आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यास जामीन मंजूर करताना सोमवारी घेतली.
न्या. आर. के. अगरवाल व न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने त्यांच्या २५ पानी निकालपत्रात म्हटले की, एटीएसचे मूळ आरोपपत्र व नंतर एनआयएने दाखल केलेले पुरवणी आरोपपत्र यांच्यातील तफावत पाहिली तर मुळात भोपाळ येथे झालेल्या ‘अभिनव भारत’च्या बैठकीत बॉम्बस्फोटाचा कट शिजणे, त्यातील कर्नल पुरोहित यांचा सहभाग, त्यांनी स्फोटासाठी आरडीएक्स पुरविणे आणि स्फोटासाठी आरडीएक्स वापरले जाणे या सर्वांवरच प्रश्नचिन्ह उभे राहते.
एनआयने केलेल्या तपासाचा हवाला देत न्यायालयाने म्हटले: कर्नल पुरोहित यांच्याविरुद्ध लष्करानेही चौकशी केली होती. त्या चौकशीत सहआरोपी सुधाकर चतुर्वेदी याच्या घरी स्फोटके तयार केल्याविषयीचे पूर्णपणे वेगळेच कथानक समोर आले. त्या चौकशीत साक्ष दिलेल्या साक्षीदाराचे एनआयने पुन्हा जबाब नोंदविल. त्यात त्याने बॉम्बस्फोटाच्या दिवशी रात्री एटीएसचे पोलीस निरीक्षक बागडे चतुर्वेदी घरी नसताना त्यांच्या घरी गेल्याचे सांगितले. यामुळे चतुर्वेदी याच्या घरी आरडीएक्स सापडल्याचे एटीएसचे म्हणणे संशयास्पद ठरते.
एनआयएने तपास हाती घेतल्यावर अभियोग पक्षाच्या ७९, ११२ व ५५ क्रमांकांच्या साक्षीदारांनी आधी दिलेल्या जबान्या फिरविल्या व एटीएसने पुरोहित व इतर आरोपींना गोवण्यासाठी दमदाटी करून खोटी साक्ष देण्यास भाग पाडल्याचे सांगितले, या एनआयएच्या पुरवणी आरोपपत्रातील भागाचीही न्यायालयाने नोंद घेतली.
अभियोग पक्षाच्या साक्षीदार क्र. ७९ च्या एनआयने नोंदविलेल्या फेरजबानीचा संदर्भ देत खंडपीठाने म्हटले की, या साक्षीदाराने दंडाधिकाºयांपुढे जबानी देताना सांगितले की, ‘अभिनव
भारत’च्या भोपाळमध्ये झालेल्या बैठकीला आपण कधीच हजर नव्हतो. किंबहुना तपासात एटीएसने मे
२००९ मध्ये भोपाळच्या राम मंदिरात नेले तेव्हाच आपण प्रथम भोपाळला गेलो होतो.
धाक दाखवून घेतले जबाब?
न्यायालयाने
म्हटले की, एनआयएने दाखल केलल्या पुरवणी आरोपपत्रानुसार अभियोग पक्षाच्या साक्षीदार क्र.
५५ कडून एटीएसने धाक दाखवून पुढील गोष्टी जबानीत वदवून घेतल्या.
- सन २००६ मध्ये कर्नल पुरोहित यानी तीन शस्त्रे व त्याच्या गोळ््या आपल्याकडे ठेवायला दिल्या.
- पुरोहित यांच्या देवळाली येथील घरात आपण हिरव्या पिशवीत ठेवलेले आरडीएक्स पाहिले होत.
- समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटासाठी आरडीएक्स पुरविल्याचे पुरोहित यांनी आपल्याकडे कबूल केले.
- आॅक्टो-नोव्हेंबर २००८ मध्ये नाशिक जिल्ह्यात काही तरी मोठे करायचे ठरल्याचे पुरोहित यांनी आपल्याला सांगितले.
- मालेगाव बॉम्बस्फोट आपणच इतरांच्या
मतदीने केल्याची कबुली पुरोहित यानी आपल्यापाशी दिली.