पॅन आणि आधार कार्ड आजच करा संलग्न अन्यथा..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 07:33 AM2021-03-31T07:33:03+5:302021-03-31T07:34:03+5:30
PAN and Aadhar link : आधार व पॅन ही दोन्ही कार्डे आता प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचे घटक ठरू लागले आहेत. अनेकदा आर्थिक व्यवहारांसाठी या दोन्हीपैकी एका कार्डाची अनिवार्यता असते.
नवी दिल्ली - आधार व पॅन ही दोन्ही कार्डे आता प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचे घटक ठरू लागले आहेत. अनेकदा आर्थिक व्यवहारांसाठी या दोन्हीपैकी एका कार्डाची अनिवार्यता असते. प्राप्तिकराचे विवरणपत्र भरण्यासाठी तर पॅन क्रमांक असणे सक्तीचे करण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आधार आणि पॅन ही दोन्ही कार्डे परस्परांना संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी अनेकदा मुदतवाढही देण्यात आली. आज, ३१ मार्च रोजी ही मुदत संपुष्टात येत आहे...
आधार कार्डवर जसे नाव असेल त्याच क्रमाने ‘लिंक आधार’वर नाव नमूद करा
जन्मतारीख, पत्ता इत्यादी आवश्यक सर्व रकाने काळजीपूर्वक भरा
सगळ्यात शेवटी कॅपचा कोड एन्टर करा, असे लिहिले असेल. हा कॅपचा कोडही नीट पाहून नमूद करा
आधार आणि पॅन कार्ड संलग्नता
आधार आणि पॅन कार्ड संलग्न करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत
त्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली आहे
दोन्ही कार्ड संलग्न
न केल्यास १ हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे
www.incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या
त्यानंतर त्यावर तुमचा पॅन कार्डाचा आणि आधार कार्डाचा क्रमांक त्यावर नमूद करा