जोड (प्रतिक्रिया)

By admin | Published: August 11, 2015 10:11 PM2015-08-11T22:11:40+5:302015-08-11T22:11:40+5:30

स्थानिकांची अडवणूक थांबवावी

Attachment | जोड (प्रतिक्रिया)

जोड (प्रतिक्रिया)

Next
थानिकांची अडवणूक थांबवावी
मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात २००३ मध्ये मी जीव रक्षकाचे काम केले होते. यापूर्वीदेखील कुंभमेळे पाहिले; परंतु आताच्या कुंभमेळ्यात झाला तेवढा त्रास कधीच पाहिला नाही. गोदाघाटावर स्थानिक रहिवासी असलेले आमच्यासारखे काही होतकरू लोक पोटापाण्यासाठी येथे व्यवसाय करतात. मनपा प्रशासन आणि पोलीस मात्र त्यांची अडवणूक करतात. रामसेतू पुलाजवळ आम्हाला घरी जाण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी सुद्धा अडवणूक होते.
- विक्रम सोनवणे, सलून व्यावसायिक
श्री गोरेराम को-ऑप. सोसायटी (ब) गोरेराम लेन
छोट्या व्यावसायिकांचे हाल
रामसेतूपासून ते गाडगे महाराज धर्मशाळेपर्यंत आम्ही अनेक छोटे व्यावसायिक येथील स्थानिक असून, आम्हाला व्यवसाय करता येत नाही. साधे चहाची टपरीदेखील चालविता येत नाही. इतका त्रास आतापासूनच वाढला आहे. यापूर्वी तीन सिंहस्थ बघितले; परंतु अशी अडवणूक कधी झाली नाही, आम्हाला व्यवसाय करू द्यावा.
- रवींद्र सराफ, चहाविक्रेता
गाडगे महाराज धर्मशाळेजवळ
स्थानिकांसाठी पर्यायी व्यवस्था करावी
आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून येथील बर्वे वाड्यात राहत असून, आमचे छोटे दुकान आहे; परंतु आम्हाला येथे व्यवसाय करू दिला जात नाही. स्थानिक व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. बाहेरगावच्या लोकांना गंगाघाटावर खुशाल व्यवसाय करू दिला जातो. मग आम्ही स्थानिक असून, आम्हाला ही शिक्षा कशासाठी?
- आशा खैरनार, बर्वेवाडा, कापडबाजार, गंगाघाट
आजारी यात्रेकरूंची गैरसोय
सिंहस्थ पर्वणी काळात गाडगे महाराज धर्मशाळेत सुमारे दोन हजार यात्रेकरू येणार आहेत. त्यातील कुणी यात्रेकरू आजारी पडल्यास त्याला मोठ्या दवाखान्यात कसे घेऊन जावे हा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण सर्व ठिकाणी बॅरिकेड्स लावल्यामुळे अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदाघाटालगतच्या रहिवाशांना पास (ओळखपत्र) देण्यात यावे. कारण सिंहस्थासाठी अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात येत आहेत.
- कुणाल देशमुख, व्यवस्थापक,
गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट.

Web Title: Attachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.