गुजरात निवडणूक प्रचारादरम्यान दलित नेते जिग्नेश मेवाणींवर हल्ला, भाजपावर केला आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 08:52 AM2017-12-06T08:52:09+5:302017-12-06T11:15:02+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र प्रचारादरम्यानच हल्ले, हिंसेच्याही घटना समोर येत आहे.
अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र प्रचारादरम्यानच हल्ले, हिंसेच्याही घटना समोर येत आहे. वडगाव मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दलित नेते जिग्नेश मेवाणी यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती स्वतः जिग्नेश यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाजपाच्या लोकांनी हल्ला केला, असा आरोप जिग्नेश यांनी केला आहे. 'हे घाणेरडे राजकारण असून मी हार पत्करणार नाही', अशी प्रतिक्रिया जिग्नेश यांनी दिली आहे.
To @narendramodi :
— Jignesh Mevani (@jigneshmevani80) December 5, 2017
सादर प्रणाम - में भी गुजरात का बेटा हूं मोदीजी दिल बड़ा रखा करो छाती भले 56 इंच की हो न हो। जो जीत रहा हो उस पर हमला करवाओ, ये आईडिया आपका है या अमित शाह का क्योकि ये गुजरात की तो परंपरा है नही। #ShameOnYouBJPhttps://t.co/Ah72KAeg4h
#ShamefulAct#गंदी_राजनीति
— Jignesh Mevani (@jigneshmevani80) December 5, 2017
दोस्तों आज मुझ पर बीजेपी के लोगोने तकरवाड़ा गांव में अटैक किया, बीजेपी भयभीत हो गयी है इसलिए ऐसी हरकत कर रही है पर में तो एक आंदोलनकारी हूँ, न डरूंगा न तो झुकुगा पर बीजेपी को तो हराऊंगा ही। pic.twitter.com/wOlLLfhFef