काबूलमध्ये हल्ला
By Admin | Published: December 12, 2015 02:37 AM2015-12-12T02:37:38+5:302015-12-12T02:37:38+5:30
काबूलमध्ये स्पेनच्या
क बूलमध्ये स्पेनच्या दूतावासावर हल्ला .............काबूल : काबूलमध्ये स्पेनच्या दूतावासावर शुक्रवारी हल्ला करण्यात आला. अफगाणिस्तानच्या अधिकार्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तथापि, यात काय नुकसान झाले याबाबतची अधिकृत माहिती समजू शकली नाही. मध्य काबूलमध्ये शेरपूरस्थित दूतावासाजवळ सायंकाळी जोरदार कारबॉम्बचा स्फोट झाला. या परिसरात गोळीबारही झाल्याचे सांगण्यात आले. सरकारी आणि विदेशी कार्यालयांना तालिबानकडून लक्ष्य बनविण्यात येत आहे. तालिबानने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली तरी आमचे लक्ष्य विदेशी अतिथिगृह होते, असे तालिबानने सांगितले आहे. हे अतिथिगृह दूतावास परिसरातच आहे का? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. स्पेनची न्यूज एजन्सी युरोपा प्रेस यांनी सरकारी सूत्रांचा हवाला देऊन सांगितले की, राष्ट्रपती मारिआनो राजॉय यांना याबाबत सूचना देण्यात आली आहे.............