काश्मीरमधल्या अशांततेचा सफरचंदाला फटका

By admin | Published: September 7, 2016 12:24 PM2016-09-07T12:24:01+5:302016-09-07T12:33:26+5:30

काश्मीरमध्ये सफरचंदाचा मोसम सुरु झाला आहे. मात्र मागच्या दोन महिन्यांपासून खो-यात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनामुळे सफरचंदाच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे.

An attack of Kashmir's unrest in the apple hit | काश्मीरमधल्या अशांततेचा सफरचंदाला फटका

काश्मीरमधल्या अशांततेचा सफरचंदाला फटका

Next

ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. ७ - काश्मीरमध्ये सफरचंदाचा मोसम सुरु झाला आहे. मात्र मागच्या दोन महिन्यांपासून खो-यात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनामुळे सफरचंदाच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. काश्मीरमधल्या हिंसाचारामुळे फळांची लागवड करणा-यांचे १ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. 
 
अनेक भागात संचारबंदी असल्यामुळे फळ उत्पादकांना किरकोळ बाजारापर्यंत मालाची वाहतूक करणे अशक्य बनले आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यात काश्मीरमध्ये सफरचंदाचे उत्पादन घेतले जाते. मागच्यावर्षी इथले व्यापारी दरदिवशी दोनशे ट्रक भरुन सफरचंद देशाच्या इतर भागात पाठवत होते. 
 
२०१५-१६ च्या मोसमात काश्मीरमध्ये १९.४३ लाख मेट्रीक टन सफरचंदाचे  उत्पादन झाले होते. राज्याच्या जीडीपीमध्ये वर्षाला बागायती पिकांचा वाटा ७ हजार कोटींचा आहे. काश्मीरमधल्या या आंदोलनाचा हिमाचलप्रदेशमधील सफरचंदाची लागवड करणा-यांना फायदा होत आहे. 
 
काश्मीरमधून सफरचंदाचा पुरवठा बंद असल्याने हिमाचलप्रदेशची सफरचंद ३० ते ४० टक्क्यांनी महागली आहेत. या अस्थिरतेचा पर्यटन उद्योगाला फटका बसत आहे. काश्मीरमध्ये पर्यटनाचा जीडीपीमध्ये २० टक्के वाटा आहे. ३० टक्के जनता पर्यटनामधून मिळणा-या रोजगारावर अवलंबून आहे. 
 

Web Title: An attack of Kashmir's unrest in the apple hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.