बीआरएस आमदार बलराजू यांच्यावर हल्ला; काँग्रेस कार्यकर्त्यांवर दगडफेकीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 08:58 IST2023-11-12T08:58:19+5:302023-11-12T08:58:48+5:30
बलराजू हे अचंपेटचे आमदार आहेत. प्रचार संपवून ते घरी निघाले होते.

बीआरएस आमदार बलराजू यांच्यावर हल्ला; काँग्रेस कार्यकर्त्यांवर दगडफेकीचा आरोप
तेलांगणामध्ये रात्रीच्या सुमारास सत्ताधारी पक्ष बीआरएस आमदार गव्वाला बलराजू यांच्यावर हल्ला झाला आहे. बलराज यांच्यावर शुक्रवारी रात्री जोरदार दगडफेक करण्यात आली. यामध्ये जखमी झालेल्या आमदारांना पुढील उपचारासाठी हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बलराजू हे अचंपेटचे आमदार आहेत. प्रचार संपवून ते घरी निघाले होते. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि बीआरएस कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांत राडा सुरु झाला. यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर दगडफेक केल्याचा आरोप बीआरएस कार्यकर्त्यांनी केला आहे.
#WATCH | Nagarkurnool, Telangana: Last night, a clash occurred between BRS and Congress leaders in Achampet. (11.11) pic.twitter.com/4Geh6F0D2G
— ANI (@ANI) November 12, 2023
काँग्रेसचे उमेदवार वामकृष्णा यांनी व त्यांच्या समर्थकांनी आपल्यावर दगडफेक केल्याचा आरोप बीआरएस कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे अचंपेटमध्ये तणावाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही पक्षांना पांगवले.
అచ్చంపేట ఎమ్మెల్యే గువ్వల బాలరాజు మీద కాంగ్రెసు గుండాల దాడి., వరుస ఓటమి భయంతో దాడికి తెగబడిన గుండాలు..
— Guvvala Balaraju (@GBalarajuTrs) November 11, 2023
ఈ దాడిలో ఎమ్మెల్యే గువ్వల బాలరాజు గారి పైకి రాళ్ళతో దాడి చేసిన వంశీకృష్ణ., అతని అనుచరులు..
మెరుగైన వైద్యం కోసం హైదరాబాద్ కి తరలింపు.. pic.twitter.com/5WXdFzcX28