तामिळनाडूमध्ये बसपा प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांच्यावर हल्ला, 6 आरोपींनी घरासमोरच केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 11:56 PM2024-07-05T23:56:01+5:302024-07-05T23:58:26+5:30
माध्यमांतील वृत्तांनुसार, आर्मस्ट्राँग पेरंबूरजवळ सेम्बियममध्ये गर्दीच्या ठिकाणी आपल्या घराजवळ मित्र आणि समर्थकांसोबत बोलत असतानाच, गुन्हेगारांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साधारणपणे सात वाजण्याच्या सुमारास तीन बाइकवरून गुन्हेगार आले आणि त्यांनी आर्मस्ट्राँग यांची हत्या केली.
बहुजन समाज पार्टीचे (बीएसपी) तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची चेन्नईमध्ये त्यांच्या घराजवळच 6 जणांनी हत्याकेल्याची घटना घडली आहे. आरोपी पेरंबूर भागातील सदायप्पन स्ट्रीटवर त्यांना चाकू मारून फरार झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दुचाकीवरून आले होते हल्लेखोर -
माध्यमांतील वृत्तांनुसार, आर्मस्ट्राँग पेरंबूरजवळ सेम्बियममध्ये गर्दीच्या ठिकाणी आपल्या घराजवळ मित्र आणि समर्थकांसोबत बोलत असतानाच, गुन्हेगारांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साधारणपणे सात वाजण्याच्या सुमारास तीन बाइकवरून गुन्हेगार आले आणि त्यांनी आर्मस्ट्राँग यांची हत्या केली.
चाकूच्या सहाय्याने हल्ला -
माध्यमांतील वृत्तांनुसार, हल्ल्यानंतर जवळचे लोक आर्मस्ट्राँग यांना वाचवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंतच, गुनहेगार तेथून पळून गेले होते. आर्मस्ट्राँग यांचा आवाज ऐकल्यनंतर, त्यांच्या घरातील लोकही धावून आले. यावेळी आर्मस्ट्राँग यांच्या डोक्याला आणि गळ्याला गंभीर जखमा झालेल्या होत्या.
#WATCH | Tamil Nadu: Visuals from outside Rajiv Gandhi General Hospital in Chennai, where the body of Bahujan Samaj Party (BSP) Tamil Nadu president Armstrong has been brought.
— ANI (@ANI) July 5, 2024
He was hacked to death by an unidentified mob of 6 people near his residence in Perambur, Chennai… pic.twitter.com/UxNGJArg6W
आर्मस्ट्राँग यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने थाउजन्ड लाइट्समध्ये ग्रीम्स रोडवरील एका रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच, डीसीपी आय ईश्वरन आणि एसीपी प्रवीण कुमार घटनास्थळी दाखल झाले. यानंतर, घटनेच्या तपासासाठी सेंबियमचे पोलीस निरीक्षक चिरंजीवी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आहे.