पाकिस्तानी "बॅट"च्या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण

By admin | Published: June 22, 2017 07:10 PM2017-06-22T19:10:35+5:302017-06-22T21:07:26+5:30

पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (बॅट) आज नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा भ्याड हल्ला केला आहे. बॅटने केलेल्या या हल्ल्यात भारतीय लष्कराच्या

In the attack of Pakistani "Bat", two jawans of Maharashtra, Veerramaran | पाकिस्तानी "बॅट"च्या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण

पाकिस्तानी "बॅट"च्या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण

Next

 ऑनलाइन लोकमत

 श्रीनगर, दि. 22 - पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (बॅट) आज  नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा भ्याड हल्ला केला आहे. बॅटने केलेल्या या हल्ल्यात लष्करात सेवेत असलेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण आले आहे. श्रवण माने आणि संदीप जाधव अशी वीरमरण आलेल्या दोन जवानांची नावे आहेत. जम्मूमधील पुंछ विभागात पाकिस्तानी लष्कराच्या बॅट तुकडीने हा हल्ला केला. भारतीय लष्कराने प्रत्युत्तरदाखल केलेल्या हल्ल्यात बॅटचा एक सैनिक ठार झाला, तर एक सैनिक जखमी झाला. 

आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जम्मूमधील पुंछ विभागात बॅटच्या टीमने नियंत्रण रेषेच्या आत सुमारे 600 मीटरपर्यंत घुसखोरी केली. पाकिस्तानी लष्कराने गोळीबार करत त्यांना संरक्षण दिले.  बॅटच्या सैनिकांनी गस्त घालत असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांवर  हल्ला केला. यात लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण आले.  त्यानंतर भारतीय लष्करानेही बॅटच्या टीमवर प्रतिहल्ला केला. यात बॅटचा एक सैनिक ठार झाला. तर एक जण जखमी झाला. 

याआधी 1 मे रोजी बॅटच्या सैनिकांनी नियंत्रण रेषा पार करत भारताच्या हद्दील प्रवेश केला होता. त्यावेळीत त्यांनी दोन भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली होती. तर 26 मे रोजी  बॅटने पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला होता. मात्र लष्कराने हा हल्ला हाणून पाडला होता. त्यात बॅटचे दोन सैनिक ठार झाले होते. 

पाकिस्तानी लष्कराची बॅट पथके क्रूर आणि भ्याड हल्ल्यांसाठी कुप्रसिद्ध असून, त्यांना नियंत्रण रेषा पार करून तीन किलोमीटरपर्यंत हल्ला करून परत माघारी परतण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असते.  

Web Title: In the attack of Pakistani "Bat", two jawans of Maharashtra, Veerramaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.