बु-हान वानीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जवानांवर हल्ला, 3 जवान शहीद
By admin | Published: August 9, 2016 09:53 AM2016-08-09T09:53:27+5:302016-08-09T12:18:18+5:30
हिजबूल मुजाहिद्नीनचा दहशतवादी बु-हान वानीच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच सोमवारी कुपवाडा जिल्ह्यात दहशतवादी हल्ला करण्यात आला
Next
>ऑनलाइन लोकमत -
श्रीनगर, दि. 9 - हिजबूल मुजाहिद्नीनचा दहशतवादी बु-हान वानीच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच सोमवारी कुपवाडा जिल्ह्यात दहशतवादी हल्ला करण्यात आला. बीएसएफ जवानांवर करण्यात आलेल्या या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. तर काही जवान जखमीदेखील झाले आहेत. यावेळी जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. 'कमांडर बु-हान वानीला श्रद्धांजली देण्यासाठीच आम्हीच भारतीय जवानांवर हल्ला केल्याचं', हिजबूलचा प्रवक्ता बु-हान-उद-दीन याने सांगितलं आहे.
पाकिस्तानलगत असलेल्या सीमारेषेजवळील मछिल सेक्टरमध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी बीएसएफच्या पोस्टवर फायरिंग केली. दुसरीकडे जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरच्या समस्या सोडवण्याच्या आणि लोकांमधील रोष कमी करण्याच्या हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
गेल्याच महिन्यात जवानांनी हिजबूल मुजाहिद्नीनचा कमांडर बु-हान वानीचा खात्मा केला होता. ज्यानंतर काश्मीरमधील वातावरण चिघळलं होतं. काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचारात 55 हून जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हजारांहून जास्त लोक जखमी झाले आहेत.