ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला करणाऱ्यांची ओळख पटली, लुकआउट नोटीसही जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 08:13 AM2023-06-15T08:13:29+5:302023-06-15T08:14:21+5:30
एनआयएने लुकआउट नोटीससह ४५ लोकांचे फोटो जारी केले आहेत.
ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर नुकत्याच झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटली असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) बुधवारी दिली. एनआयएने लुकआउट नोटीससह ४५ लोकांचे फोटो जारी केले आहेत. या लोकांनी मार्चमध्ये लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाची तोडफोड केली होती. तसंच त्यांच्यावर राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप आहे.
बुधवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक संदेश शेअर केला. १९ मार्च २०२३ रोजी हे लोक लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ल्यात सहभागी होती. त्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केला. जर कोणाकडे यांच्याबद्दल माहिती असेल तर कृपया ९१७२९०००९३७३ वर माहिती द्या, असा मेसेज लिहिण्यात आलाय. यापूर्वी सोमवारी (१२ जून) एनआयएनं लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात तोडफोडीच्या प्रयत्नाचं दोन तासांचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले होते. एनआयएने सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या लोकांची माहिती एजन्सीला देण्याचं आवाहन केलं आहे.
REQUEST FOR IDENTIFICATION/INFORMATION
— NIA India (@NIA_India) June 14, 2023
On 19.03.23 these persons were involved in an attack on the High Commission of India, London. They caused grievous injury and disrespected the Indian National Flag
If anyone has any information about them, please Whatsapp/DM @+917290009373 pic.twitter.com/Rhy93cFJjA
हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज
एनआयएनं खलिस्तानी हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज जारी केलं असून, माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यात एक व्हॉट्सअॅप क्रमांक देण्यात आला असून त्यासोबत तोडफोड करणाऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. १९ मार्च २०२३ रोजी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर या लोकांनी हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज अपलोड करण्यात आलं आहे. सर्व लोकांना विनंती आहे की या संदर्भात काही माहिती मिळाल्यास ७२९०००९३७३ या क्रमांवर ती देता येईल. माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल, असं एनआयएनं म्हटलंय.
तिरंग्याचा अपमान
१९ मार्च रोजी लंडनमधील खलिस्तान समर्थक आंदोलक भारतीय उच्चायुक्तालयाच्या बाल्कनीवर चढला आणि त्यानं भारतीय ध्वज खाली खेचला होता. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.