बुलेट आणि वॉलेट दोन्हींच्या माध्यमातून चीनवर करावा लागेल हल्ला, सोनम वांगचूक यांचा मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 05:10 PM2020-06-21T17:10:51+5:302020-06-21T17:14:57+5:30
शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या सोनम वांगचूक यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना मोलाचा सल्ला दिला आहे.
लेह (लडाख) - लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव जैसे थे आहे. चिनी सैन्याशी झालेल्या झटापटीत २० भारतीय जवानांना वीरमरण आल्याने देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, लडाखमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असलेल्या सोनम वांगचुक यांनीसुद्धा चीनच्या दगाबाजीला भारताने धडा शिकवला पाहिले, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
चीनने त्यांच्या देशांतर्गत समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतासोबत तणाव निर्माण करण्याची रणनीती अवलंबली आहे. चीनच्या या कारस्थानाला आपण बुलेट आणि वॉलेट अशा दोन माध्यमातून प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे मत सोनम वांगचूक यांनी व्यक्त केले आहे.
शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या सोनम वांगचूक यांनी या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना मोलाचा सल्ला दिला आहे. लडाखमध्ये भारत आणि चीनच्या लष्करामध्ये निर्माण झालेला तणाव हा चीनने जाणूनबुजून निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बॉयकॉट मेड इन चायना अभियानाची सुरुवात करताना त्यांनी चीनला आर्थिक मोर्चावरही घेरण्याचे आवाहन केले आहे.
आम्ही चीनकडून मोत्यांपासून ते करड्यांपर्यंत सुमारे पाच लाख कोटी रुपयांचे सामान खरेदी करतो. त्यानंतर हाच पैसा सीमेवर हत्यार आणि बंदुकांच्या माध्यमातून आपल्याच जवानांच्या मृत्यूचे कारण बनू शकतो. तसेच चीन केवळ भारतासोबतच तणाव निर्माण करत नाही आहे तर दक्षिण चीन समुद्रात व्हिएतनाम, तैवान आणि आता हाँगकाँग या देशांचीही कुरापत काढत आहे, असे वांगचूक यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले
भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण....
ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली
गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन
चीनमधील १४० कोटी जनता मानवाधिकांरांपासून वंचित आहे. त्यांच्याकडून वेठबिगारांसारखे काम करवून घेतले जाते. चीनमध्ये गेल्या काही काळापासून बेरोजगारी वेगाने वाढत आहे. त्यामुळे चिनी सैन्याला आपल्या जनतेमध्ये नाराजी आणि बंडखोरी निर्माण होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे या सर्वांवरून देशवासियांचे लक्ष विचलित करण्यासाठी चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कुरापती काढल्या जात आहेत, असे वांगचूक म्हणाले.