भारतीय विद्यार्थ्यांवर होस्टेलमध्ये हल्ले; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची याचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 03:04 PM2024-05-22T15:04:46+5:302024-05-22T15:04:46+5:30

...त्यामुळे रात्री होस्टेलच्या लाइट बंद करून टॉर्चमध्ये सर्व कामे करावी लागत आहेत. याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर राजस्थानी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा सतर्क झाले असून, ते केंद्र सरकारशी सतत संपर्कात आहेत.

Attacks on Indian students in hostels; Request for help from Prime Minister Narendra Modi | भारतीय विद्यार्थ्यांवर होस्टेलमध्ये हल्ले; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची याचना

भारतीय विद्यार्थ्यांवर होस्टेलमध्ये हल्ले; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची याचना

जितेंद्र प्रधान

जयपूर : किर्गिझस्तानमध्ये उसळलेल्या हिंसाचारादरम्यान तेथे भारतातील तब्बल १५ हजार तरुण अडकले आहेत. यात महाराष्ट्र, राजस्थानमधील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. सतत हिंसाचार सुरू असल्याने आता भारतीय तरुण भीतीच्या छायेखाली वावरत असून, त्यांनी कुटुंबाच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. 
तरुणांनी सांगितले की, होस्टेलमध्ये घुसून हिंसाचार करणारे अतिशय बेदम मारहाण करत आहेत. त्यामुळे रात्री होस्टेलच्या लाइट बंद करून टॉर्चमध्ये सर्व कामे करावी लागत आहेत. याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर राजस्थानी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा सतर्क झाले असून, ते केंद्र सरकारशी सतत संपर्कात आहेत.

भारतीय टार्गेटवर
- बिश्केकमध्ये हिंसक जमाव वसतिगृहांना टार्गेट करत आहे. 
- या वसतिगृहांमध्ये भारतासह बांगलादेश आणि पाकिस्तानसह अनेक देशांतील विद्यार्थी राहतात. या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश वैद्यकीय विद्यार्थी आहेत. पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त आणि भारतीय विद्यार्थी टार्गेटवर आहेत.

येथे करा संपर्क
मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी सद्य:स्थितीबाबत चर्चा केली आहे. सचिवालयातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ९९६५५५७१००४१ हा आपत्कालीन क्रमांक जारी 
केला आहे.

नेमके काय झाले? 
एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या हिंसाचाराला सुरुवात झाली. व्हिडीओत प्रामुख्याने पाकिस्तान आणि इजिप्तमधील विद्यार्थी दिसत आहेत. 
१३ मेच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोक संतप्त झाले आणि त्यांनी विदेशी विद्यार्थ्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. लोक विद्यार्थ्यांना इतके मारत आहेत की यात विद्यार्थी बेशुद्ध झालेले दिसत आहेत.
 

Web Title: Attacks on Indian students in hostels; Request for help from Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.