'पीडित कुटुंबीयास 50 लाख रुपये देत खोटा जबाब नोंदविण्यासाठी दबाव, गुन्हे दाखल'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 05:47 PM2020-10-05T17:47:53+5:302020-10-05T17:57:59+5:30
Hathras Gangrape : विरोधकांना उत्तर प्रदेशचा विकास पचवणे कठीण जात आहे. त्यामुळे आता ते कट-कारस्थान करत आहेत, असे म्हणत, भाजपाच्या कार्यकत्यांनी देशाच्या विकासासाठी स्वतःला समर्पित करावे, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
लखनौ - हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या आडून जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काही समाजकंटकांकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे उत्तर प्रदेशच्या एडीजींनी (कायदा व सुव्यवस्था )म्हटले आहे. या दुर्दैवी घटनेच्या आडून राज्यातील शांतता बिघडवणे आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित कुटुंबीयांवर खोटा जबाब नोंदविण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचेही एडीजी प्रशांत कुमार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. तत्पूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अशाच प्रकारे माहिती दिली आहे.
विरोधकांना उत्तर प्रदेशचा विकास पचवणे कठीण जात आहे. त्यामुळे आता ते कट-कारस्थान करत आहेत, असे म्हणत, भाजपाच्या कार्यकत्यांनी देशाच्या विकासासाठी स्वतःला समर्पित करावे, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. आमचे विरोधक आंतरराष्ट्रीय फंडिंगच्या माध्यमाने जात आणि संप्रदायावर आधारीत दंगलींचा पाया घालून आमच्या विरोधात कट-कारस्थान आखत आहेत. गेल्या आठवडाभरापासून विरोधकांना राज्यात दंगली बघायच्या आहेत. मात्र, सर्व कटांवर मात करून आपल्याला पुढे जायचे आहे, असे योगींनी म्हटले आहे. त्यानंतर, आता युपीचे एडीजी प्रशांत कुमार यांनीही योगींची री ओढल्याचे दिसून येते.
हाथरस में दुर्भाग्यपूर्ण घटना को लेकर कुछ अराजक तत्व प्रदेश में अमन चैन बिगाड़ने और जातीय द्वेष फैलाने के उद्देश्य से पीड़ित परिवार को भड़काने, गलत बयान देने के लिए दबाव बनाने और उन्हें 50लाख रुपये का प्रलोभन देने आदि के संबंध में अभियोग पंजीकृत किया गया है : ADG, लॉ एंड ऑर्डर,UP https://t.co/6gKN7RHrLy
— ANI_HindiNews (@AHindinews) October 5, 2020
रविवारी हाथरस येथे कोविडच्या बंधनांचे उल्लंघन करत, नागरिकांनी हिंसात्मक पाऊल उचलल्याचे दिसून आले. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच, सोशल मीडियावर समाजविघातक आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तर, पीडित कुटुंबीयांना पैशाचे लालच दाखवून, 50 लाख रुपये देऊन जबाब नोंदविण्यासाठी दबाव टाकला जात असल्याप्रकरणीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे प्रशांत कुमार यांनी सांगितले.
इस्लामिक देशांकडून फंडिंग
तत्पूर्वी, संरक्षण संस्थांनी विरोधाआडून राज्यात जातीय दंगे घडवण्याचा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा मलीन करण्याचा मोठा कट रचला जात आसल्याचा खुलासा केल्याचे, सरकारकडून सांगण्यात आले होते. सरकारच्या म्हणण्या प्रमाणे, एका वेबसाईला इस्लामिक देशांकडून फंडिंग होत होते. एम्नेस्टी इंटरनॅशनल संस्थेशीही याचे संबंध असल्यासंदर्भात चौकशी सुरू आहे.