हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखल्याप्रकरणी १३ शेतकऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

By मोरेश्वर येरम | Published: December 24, 2020 11:00 AM2020-12-24T11:00:46+5:302020-12-24T11:02:38+5:30

अंबालाच्या अग्रसेन चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच काही शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकवले होते.

attempt to murder case against 13 farmers for blocking Haryana CM Khattar's convoy | हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखल्याप्रकरणी १३ शेतकऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखल्याप्रकरणी १३ शेतकऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्री खट्टर यांच्या ताफ्याला शेतकऱ्यांनी दाखवले होते काळे झेंडेशेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी काँग्रेस आक्रमकभाजप सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

नवी दिल्ली
नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासमोर निषेध व्यक्त करण्यासाठी त्याचा ताफा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या १३ शेतकऱ्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा आणि दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

हरियाणा सरकारच्या या कृत्यावर काँग्रेसने कडाडून टीका केली आहे. शेतकऱ्यांसंबंधी सरकार कसं निष्ठूर आहे हे या कारवाईमधून कळतं, असं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कुमारी सेजला म्हणाल्या. हरियाणाच्या अंबालामध्ये मंगळवारी शेतकऱ्यांच्या एका गटानं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते.

आगामी पालिका निवडणुकांसाठी पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सभांना संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्री खट्टर अंबालामध्ये आले होते. 
अंबालाच्या अग्रसेन चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच काही शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकवले होते. याशिवाय, सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला आणि काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. त्यातील काही जणांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांवर लाठ्या फेकल्याचंही पोलिसांनी सांगितलं. 

"शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करुन हरियाणा सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. शेतकऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणारं सरकार किती निराशेच्या गर्तेत बुडालंय हे दिसून येतं", असं कुमारी सेजला म्हणाल्या. भाजप सरकारकडून वारंवार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. "भाजप सरकारवरने जनतेचा विश्वास गमावला आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून झाला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री खट्टर यांना काळे झेंडे दाखवले जात आहेत", अशी टीका कुमारी सेजला यांनी केली.

Web Title: attempt to murder case against 13 farmers for blocking Haryana CM Khattar's convoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.