सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 05:39 AM2024-10-30T05:39:01+5:302024-10-30T05:42:34+5:30
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून त्यात काँग्रेसतर्फे प्रियांका गांधी लढत देत आहेत.
वायनाड: भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. वायनाडमध्ये दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे मोठे नुकसान झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी कोणताही निधी न देता केंद्र सरकार त्यांची उपेक्षा करत आहे असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मंगळवारी केला.
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून त्यात काँग्रेसतर्फे प्रियांका गांधी लढत देत आहेत. त्यांनी सांगितले की, भाजपप्रणित केंद्र सरकारने दहा वर्षांत जी धोरणे आखली ती देश, जनता यांचा अनादर करणारी होती.
पूर्वी राजकारणात जनतेला सर्वोच्च आदराचे स्थान होते. अशाच राजकारणाच्या मुशीतून देशाची राज्यघटना तयार झाली आहे. मात्र या सर्व गोष्टींपेक्षा भाजपच्या राजकारणाचा बाज वेगळा आहे. हा पक्ष विद्वेष पसरविण्याचे, फुट पाडण्याचे काम करत आहेत. (वृत्तसंस्था)