हा तर सनातनवरून लक्ष वळविण्याचा प्रयत्न; शरद पवारांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 06:18 AM2018-08-30T06:18:02+5:302018-08-30T06:18:49+5:30

अटक झालेले हे कार्यकर्ते नक्षली नक्कीच नाहीत

This is an attempt to turn away from Sanatan; Sharad Pawar's serious charge | हा तर सनातनवरून लक्ष वळविण्याचा प्रयत्न; शरद पवारांचा गंभीर आरोप

हा तर सनातनवरून लक्ष वळविण्याचा प्रयत्न; शरद पवारांचा गंभीर आरोप

googlenewsNext

नवी दिल्ली : पुणे पोलिसांनी डाव्या विचारांच्या ज्यांना अटक केली, त्यापैकी अनेकांना मी ओळखतो. त्यांची कोणतीही विचारसरणी असली तरी ते नक्षलवादी नक्कीच नाहीत, याची मला खात्री आहे. त्यांच्या घरी जाऊ न मी सारे तपशील समजावून घेणार आहे, असे प्रतिपादन शरद पवार यांनी येथे केले.

कर्नाटक व महाराष्ट्रात सनातन संस्थेच्या काही सदस्यांना अटक झाल्यानंतर जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बहुदा हे अटक व धाडसत्र केले असावे, अशी माहिती समजली आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधानपदाचा उमेदवार आज घोषित करण्याची आवश्यकता नाही. मी स्वत: उमेदवार नाही. सोनिया गांधी, देवेगौडा व मी अशा तिघांनी विविध पक्षांशी चर्चा करावी, प्रादेशिक स्तरांवर व्यवहार्य आघाड्यांची निर्मिती करावी असे सूत्र अनेकांनी सुचवले आहे. अर्थात याबाबत अंतिम निर्णय सर्वांशी बोलूनच ठरेल.

Web Title: This is an attempt to turn away from Sanatan; Sharad Pawar's serious charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.