सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मला लाच देण्याचा प्रयत्न झाला - पहलाज निहलानी
By admin | Published: March 4, 2016 07:07 PM2016-03-04T19:07:45+5:302016-03-04T19:07:45+5:30
काही चित्रपट निर्मात्यांनी त्यांचे चित्रपट मंजूर करुन घेण्यासाठी मला लाच देण्याचा प्रयत्न केला असा धक्कादायक गौफ्यस्फोट सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहालानी यांनी केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - काही चित्रपट निर्मात्यांनी त्यांचे चित्रपट मंजूर करुन घेण्यासाठी मला लाच देण्याचा प्रयत्न केला असा धक्कादायक गौफ्यस्फोट सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहालानी यांनी केला आहे.
चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्सॉरने कात्री फिरवू नये, ती दृश्ये तशीच कायम रहावीत यासाठी काही निर्मात्यांनी मला लाच देण्याचा प्रयत्न करुन पाहिला. काही जणांना त्यांच्या चित्रपटात काट-छाट नको असते. कुठल्याही परिस्थितीत त्यांना सेन्सॉर बोर्डाच्या मंजुरीचे प्रमाणपत्र हवे असते. त्यामुळे काहींनी मला लाच देण्याचा प्रयत्न करुन पाहिला. पण मी त्यांची नावे जाहीर करणार नाही असे पहलाज निहालानी यांनी सांगितले.
सेन्सॉर बोर्डातील कुठलाही कर्मचारी साधी भेटवस्तूही स्वीकारत नाही. सेन्सॉर बोर्डात शून्य भ्रष्टाचार आहे. माझ्या स्टाफने दिवाळीच्या भेटवस्तू स्वीकारयलाही नकार दिला. मला त्यांचा अभिमान आहे असे निहलानी यांनी सांगितले. सोसायटी मॅगझिनच्या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी ही माहिती दिली.