बियर पिण्यास मनाई केल्याने मंधान यांच्यावर हल्लयाचा प्रयत्न

By admin | Published: March 12, 2016 12:33 AM2016-03-12T00:33:26+5:302016-03-12T00:33:26+5:30

जळगाव: सिंधी कॉलनी परिसरातील सेवा मंडळ मंदिराच्या भींतीला लागून बियर पिण्यास मनाई केल्याने तीन तरुणांनी अशोक मंधान यांच्यावर नारळ तोडण्याच्या सुर्‍याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सिंधी समाजातील काही तरुणांनी त्या तरुणांना बदडून काढले. या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता ही घटना घडली.

Attempted to raid the monastery by refusing to drink beer | बियर पिण्यास मनाई केल्याने मंधान यांच्यावर हल्लयाचा प्रयत्न

बियर पिण्यास मनाई केल्याने मंधान यांच्यावर हल्लयाचा प्रयत्न

Next
गाव: सिंधी कॉलनी परिसरातील सेवा मंडळ मंदिराच्या भींतीला लागून बियर पिण्यास मनाई केल्याने तीन तरुणांनी अशोक मंधान यांच्यावर नारळ तोडण्याच्या सुर्‍याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सिंधी समाजातील काही तरुणांनी त्या तरुणांना बदडून काढले. या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता ही घटना घडली.
संत गेलाराम बाबा यांचा शनिवारी जन्मोत्सव साजरा होणार असल्याने मंदीरात त्याची तयारी सुरु होती. रात्री राज तडवी (रा.तांबापुरा) व त्याच्यासोबतचे दोन जण मंदीराला लागून बियर पित होते. अशोक मंधान यांनी त्यांना हटकल्याने त्यातील राज तडवी याने शेजारी असलेल्या नबाब पठाण याच्या नारळाच्या गाडीवरील सुरा आणून हल्ला केल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मंधान यांनी केला. वाद वाढल्याने जिल्हा पेठ पोलिसांना घटना कळविण्यात आली. त्यांनी घटनास्थळी भेट दिली असता राज हा फरार झाला तर गाडीजवळ असलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलीस गाडीत बसलेल्या या तरुणांनाही बेदम मारहाण करण्यात आली. नंतर मंधान व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पेठ गाठून त्या तरुणांवर कारवाइची मागणी केली.

Web Title: Attempted to raid the monastery by refusing to drink beer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.