महिलांना अश्लील मेसेज पाठवणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2016 04:23 AM2016-07-08T04:23:59+5:302016-07-08T04:23:59+5:30

दीड हजार महिलांना अश्लील मॅसेज पाठविणाऱ्या ३१ वर्षीय सराईतास पोलिसांनी गजाआड केले. मोहंमद खालीद, असे त्याचे नाव असून, एका महिलेच्या तक्रारीनंतर त्याला अटक केली असता इतरही

Attempting to send sexually explicit messages to women | महिलांना अश्लील मेसेज पाठवणारा अटकेत

महिलांना अश्लील मेसेज पाठवणारा अटकेत

Next

नवी दिल्ली : दीड हजार महिलांना अश्लील मॅसेज पाठविणाऱ्या ३१ वर्षीय सराईतास पोलिसांनी गजाआड केले. मोहंमद खालीद, असे त्याचे नाव असून, एका महिलेच्या तक्रारीनंतर त्याला अटक केली असता इतरही अनेक जणींना त्याने असेच मॅसेज करून त्रास दिला होता, अशी धक्कादायक माहिती पुढे आली.
दिल्लीतील एका महिलेला दोन मोबाइल फोन नंबर्सवरून अश्लील छायाचित्रे व लिखित मॅसेज पाठविण्यात आले होते. तिने या नंबर्सवर संपर्क साधला असता उलट तिलाच धमकाविण्यात आले. पॉर्न वेबसाईटवर तिचा नंबर व व्हॉटस् अ‍ॅपवरील छायाचित्र अपलोड करण्याची पलीकडून धमकी देण्यात आली. अखेर महिलेने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी धमकी देणाऱ्याच्या नंबरचा तपशील मिळवला असता बनावट ओळखपत्र वापरून ते सीमकार्ड खरेदी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तथापि, पोलिसांनी आपला तपास चालूच ठेवला व एका संशयितावर त्यांनी नजर स्थिर केली.
दिल्लीच्या सदर बाजार परिसरात आपल्या वडिलांबरोबर बॅगचे एक दुकान चालविणाऱ्या मोहंमद खालीदला अखेर पोलिसांनी उचलले. आधी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; परंतु पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून २ मोबाइल फोनही जप्त करण्यात आले, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजयसिंग यांनी दिली.
त्याच्या फोनमधून सुमारे २ हजार महिलांचे फोन नंबर्स मिळाले. तो सहजगत्या कोणत्याही नंबरवर कॉल करीत असे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

असा सापडला जाळ्यात
त्याने बनावट ओळखपत्र वापरून सीमकार्ड मिळवले होते. त्यामुळे बरेच दिवस त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकत नव्हते.
ते सीम त्याने दिल्लीच्या सदर बाजार भागातून खरेदी केले होते. त्याचे दुकानही त्याच परिसरात आहे.
पोलिसांनी सीमच्या व्यवहारांवर नजर ठेवली असता ते त्याच भागात वापरले जाते, असे लक्षात आले.
सीमचे रिचार्जही तो याच भागातून करीत होता. त्यावरून पोलिसांनी त्याला संशयित म्हणून पकडले. नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: Attempting to send sexually explicit messages to women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.