गुलामगिरीची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न म्हणजे ‘कर्तव्यपथ’; बीटिंग रिट्रीटमध्ये भारतीय वाद्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 10:22 AM2022-09-09T10:22:31+5:302022-09-09T10:22:50+5:30

भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. १५ डिसेंबर १९११ रोजी ब्रिटनचे राजा जॉर्ज पंचम भारत दौऱ्यावर आले असताना दिल्लीतील रस्त्याला किंग्ज वे हे नाव देण्यात आले होते. किंग्ज वेचे भाषांतर करून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या रस्त्याचे नाव राजपथ असे ठेवण्यात आले होते.

Attempting to change the mentality of slavery is the Kartavya Path Inclusion of Indian instruments in Beating Retreat | गुलामगिरीची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न म्हणजे ‘कर्तव्यपथ’; बीटिंग रिट्रीटमध्ये भारतीय वाद्यांचा समावेश

गुलामगिरीची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न म्हणजे ‘कर्तव्यपथ’; बीटिंग रिट्रीटमध्ये भारतीय वाद्यांचा समावेश

Next

शरद गुप्ता

नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा स्वातंत्र्यदिनी पाच उद्दिष्टे जाहीर केली होती. राजपथाचे कर्तव्यपथ असे नामकरण करणे हा त्याच उद्दिष्टांचा एक भाग आहे. गुलामगिरीची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न म्हणजे कर्तव्यपथ असे त्याचे वर्णन केले जाते. भारतीय भाषांतील शिक्षणापासून ते बीटिंग रिट्रीटमध्ये भारतीय वाद्यांचा केलेला समावेश अशा अनेक गोष्टी मोदी सरकारने आवर्जून केल्या आहेत. 

भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. १५ डिसेंबर १९११ रोजी ब्रिटनचे राजा जॉर्ज पंचम भारत दौऱ्यावर आले असताना दिल्लीतील रस्त्याला किंग्ज वे हे नाव देण्यात आले होते. किंग्ज वेचे भाषांतर करून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या रस्त्याचे नाव राजपथ असे ठेवण्यात आले होते.

मोदी सरकारने नौदलाच्या ध्वजावरील सेंट जॉर्जचा क्रॉस हटविला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी राजमुद्रेवरून प्रेरणा घेऊन नौदलाची नवी मुद्रा तयार करण्यात आली. त्यासहित नौदलाचा नवा ध्वज डौलाने फडकू लागला. २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दिल्लीतील रेस कोर्स रोडचे लोककल्याण मार्ग असे नामकरण केले. 

अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा बदलली
ब्रिटिश राजवटीत चालत आलेली ९२ वर्षांची परंपरा तोडून मोदी सरकारने सर्वसामान्य अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्प समाविष्ट केला. फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी अर्थसंकल्प मांडण्याची पद्धती मोडीत काढून फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी देशाचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली. १५०० हून अधिक जुनाट कायदे मोदी सरकारने रद्द केले. इंडिया गेटजवळ आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा  बसविण्यात आला आहे.

एसटी महामंडळाला कोरोना पूर्व काळात  श्रावण आणि गणेशोत्सवाचे ५५० ते ६०० कोटींचे उत्पन्न मिळत होते. कोरानानंतर एसटी हळूहळू पूर्वपदावर येत असून ऑगस्टमध्ये ४५० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. 
-  शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

Web Title: Attempting to change the mentality of slavery is the Kartavya Path Inclusion of Indian instruments in Beating Retreat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.